
विरार : वसई-विरार महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे 700 ते 800 कोटींचे बजेट असते. 2025-26 या आर्थिक वर्षात 800 ते 850 कोटींचे बजेट आहे. परंतु; या 800 कोटींच्या तरतुदीतील 10 टक्के अधिकाऱ्यांच्या खिशात जातात, असा गौप्यस्फोट माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी केला आहे.