Sudhir Mungantiwar | मुनगंटीवारांनी विधानसभा अध्यक्षांना आठवून दिल्या त्यांच्याच घरावरील ओळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुनगंटीवारांनी विधानसभा अध्यक्षांना आठवून दिल्या त्यांच्याच घरावरील ओळी

मुनगंटीवारांनी विधानसभा अध्यक्षांना आठवून दिल्या त्यांच्याच घरावरील ओळी

आजपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला मुंबईत सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवसाच्या पहिल्या सत्रात विरोधकांनी राज्यातील भरती प्रक्रियेत होणाऱ्या घोटाळ्यांचा मुद्दा लावून धरला. विधानपरिषदेतही दरेकरांनी या विषयावर भाष्य केलं. पेपरफुटी प्रकरणात काँग्रेस देखील विरोधी पक्षासोबत असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. मात्र, विधानसभेत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांना त्यांच्या घरावर लिहिलेल्या ओळींची आठवण करून दिली.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अधिवेशनाआधी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. ही जागा महाविकास आघाडी सरकारने काँग्रेससाठी ठेवल्याने नाना पटोले (Nana Patole) यांची वर्णी लागली. यानंतर विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठीही निवड प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादीचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांना उपाध्यक्षपदी स्थानापन्न करण्यात आले. ही निवड झाल्यानंतर त्यांनी दिलेलं भाषण गाजलं होतं. त्या भाषणाची चर्चाही झाली. या भाषणात झिरवळ यांनी त्यांच्या घरावर लिहिलेल्या काही ओळींचा उल्लेख होता.

दरम्यान, आज अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर आक्षेप घेतला. अध्यक्ष पदाच्या निवडीवरून आलेल्या प्रस्तावावर त्यांनी मत नोंदवलं. अध्यक्षांच्या निवडीबाबत एकमत करता येतं. विरोधीपक्षांसोबत एकमताने अध्यक्ष निवडता आला असता. अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती खुज्या विचारांची असता कामा नये, असं मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी घोडेबाजार या शब्दावरही आक्षेप घेतला. महाविकास आघाडी सरकार जनतेशी बेईमानी करून स्थापन झालं आहे, असं ते म्हणाले.

अध्यक्षमहोदय तुमच्या घरावर...

या विषयावर बोलताना मुनगंटीवार यांनी नरहरी झिरवळ यांच्या घरावर असलेल्या ओळी वाचून दाखवल्या. यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं...आणि या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागतं. असं म्हणत, या सरकारकडे धैर्य नाही का, असा प्रश्न मुनगंटीवारांनी उपस्थित केला.

झिरवळ यांच्या जुन्या भाषणातील मुद्दे मुनगंटीवारांनी अधोरेखित केले.

टॅग्स :assembly session