sugar
sakal
जुईनगर : गेल्या महिन्यापासून सातत्याने वाढत असलेल्या साखरेच्या दरांनी सर्वसामान्य नागरिकांचे बजेट पुरते बिघडवले आहे. यंदा साखरेचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी कारखान्यांमधून मिळणाऱ्या साखरेच्या दरात मोठी पाढ झाली असून किरकोळ बाजारात साखरेने पन्नाशी ओलांडली आहे.