
संदीप पंडित
विरार : ''अरे खोप्या मध्ये खूप सुगरणीचा चांगला, पिलासाठी तिने खूप झाडाला टांगला'' या बहिणाबाईंच्या कवितेतील सुगरणीचे खोपे वसई किल्ल्यातील अनेक झाडावर टांगलेले आपल्याला दिसतील. सुगरण पक्षी आपले घरटे गवत, पाने आणि इतर नैसर्गिक तंतू वापरून अतिशय कुशलतेने विणतो. सुगरण पक्षी त्याच्या उत्कृष्ट घरटे बांधण्याच्या कलेमुळे उत्कृष्ट कारागीर म्हणून ओळखला जातो.