म्हणाली बाजारातून कपडे खरेदी करून येते आणि सासऱ्यांच्या शेतातील झोपडीत...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

२६ वर्षीय विवाहित महिलेला बळजबरीने विवाहबाह्य संबंध ठेवण्यास भाग पाडल्याने, तसेच वेळोवेळी त्रास दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या तपासाअंती दोन महिन्यांनंतर विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर मनोर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

मनोर : २६ वर्षीय विवाहित महिलेला बळजबरीने विवाहबाह्य संबंध ठेवण्यास भाग पाडल्याने, तसेच वेळोवेळी त्रास दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या तपासाअंती दोन महिन्यांनंतर विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर मनोर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

बामरोटे गावातील वनिता ढाक (वय.२६) या महिलेचा मृतदेह डिसेंबर महिन्यात (ता.२६) महामार्गावरील वाघोबा मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतातील झोपडीत आढळून आला होता. आत्महत्या करण्याच्या दोन दिवस आधी वनिता तिच्या मुलासह माहेरी गेली होती.

VIDEO : आरारा... वरातीतच नवऱ्याची फाटली पॅन्ट आणि...

मुलाला माहेरी ठेवून खनिवडे गावातील बाजारातून कपडे खरेदी करायला जात असल्याचे सांगून ती घरातून निघून गेली होती. मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. बेपत्ता असलेल्या वनिताचा मृतदेह दोन दिवसांनंतर वाघोबा मंदिराच्या मागच्या बाजूला तिच्या सासऱ्याच्या शेतातील झोपडीत आढळून आला होता. तेव्हापासून तिच्या पतीच्या नात्यातील संशयित अल्पवयीन आरोपी बेपत्ता झाला होता. या अल्पवयीन आरोपीने वनितावर दबाव टाकून तिला पळवून नेल्याची फिर्याद मृत वनिता हिच्या पतीने पोलिसांत केली आहे.

ही बातमी वाचा ः  ठाणे पालिकेत व्हाट्स अप चॅट वरुन गदारोळ

याप्रकरणी मयत महिलेच्या नातेवाईकांचे जबाब, पंचनामे आणि शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर पोलिस हवालदार मनोजकुमार पाटील यांनी अल्पवयीन आरोपीविरोधात मनोर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. त्यामुळे अल्पवयीन आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of a married woman; Offenses against a minor