मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या | Suicide | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या

मुंबई : मुंबईतल्या (Mumbai) ओशिवारा परिसरात एका भोजपुरी अभिनेत्रीनं (Bhojpuri Actress) आत्महत्या (Suicide) केली आहे. नार्कोटिक्सचे अधिकारी आहोत असं सांगुन दोन व्यक्ती तीला खंडणीसाठी धमकावत असल्यानं अभिनेत्रीनं आत्महत्या केली असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. दोन्ही नकली अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरज परदेशी आणि प्रविण वाळींबे अशी त्यांची नावं आहेत.

20 डिसेंबरला रात्री अभिनेत्री तीच्या दोन मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये पार्टी करत असताना दोन व्याक्ती हॉटेलमध्ये आल्या, आपण एनसीबीचे अधिकारी आहोत आणि हॉटेलवर एनसीबीची रेड पडली आहे असं सांगीतलं. त्यानंतर ते दोघं अभिनेत्रीसोबत असलेल्या व्यक्तींशी बोलले आणि नंतर अभिनेत्रीकडून तीच्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 40 लाखांची मागणी केली, पण नंतर 20 लाखांवर हे प्रकरण मिटवण्यात आलेे होते. आणि ठरलेली रक्कम लवकरात लवकर देण्याच्या अटीवर अभिनेत्रीला जाऊन देण्यात आले होते. पण त्यानंतर त्या दोघांकडून पैशांसाठी वारंवार फोन येऊ लागले. त्या त्रासाला कंटाळून 23 डिसेंबरला अभिनेत्रीनं तीच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

हेही वाचा: नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटनाला उधाण

अभिनेत्रीसोबत जे दोन मित्र होते, त्यांच्या साथीनंच या दोन नकली अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीला गोवण्याचा प्रयत्न केला अशी प्राथमिक माहीती पोलिसांना मिळाली आहे. ते दोघंही फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कलम 306, 170, 420, 384, 388, 389, 506 आणि 120(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Suicide Mumbai Bhojpuri Actress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai News
go to top