जॅकलीन फर्नांडीसनंतर अनेक सेलिब्रेटी इडीच्या रडारवर; सर्वांची होणार चौकशी | Jacqueline Fernandez | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jacqueline Fernandez  and sukesh chandrasekhar

जॅकलीन फर्नांडीसनंतर अनेक सेलिब्रेटी इडीच्या रडारवर; सर्वांची होणार चौकशी

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सुकेश चंद्रशेखरचे (Sukesh Chandrashekhar) अनेक बॉलीवूड स्टार्ससोबत चांगले संबंध होते, त्यामुळं कोण कोण त्याच्या संपर्कात होतं, त्या सर्वांची चौकशी (Investigation) केली जाणार आहे, यात अनेक बॉलीवूड स्टार्सचा समावेश आहे. सुकेशनं इडीला (Enforcement Directorate) दिलेल्या डिस्क्लोजर स्टेटमेंटमध्ये (statement) अनेक बॉलीवूडच्या सेलेब्रिटीची नावं घेतली आहेत, त्या सर्वांची चौकशी करण्यात येणार आहे.

हेही वाचा: शेतीत यांत्रिकीकरण वाढल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल - राजीव पोद्दार

200 कोटींच्या खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखर, त्याची बायको लिना मारीया पॉल आणि त्यांच्या साथीदारांवर दाखल केलेल्या चार्जशिटमध्ये अनेक खुलासे होत आहेत. सुकेश चंद्रशेखरनं त्याच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय की, 2015 पासून त्याची बॉलीवूडमधल़्या एका तरुण अभिनेत्रीशी वैयक्तीक ओळख आहे, जिचे वडीलही बॉलीवूडमधले मोठे सेलीब्रेटी आहेत. त्यानं तिला एनसीबीच्या एका प्रकरणात मदतही केली होती. तसंच मी अनेक अभिनेत्यांनाही ओळखतो, एका अभिनेत्यासोबत मी एका चित्रपटाची निर्मिती करणार होतो असंही युकेश चंद्रशेखरनं सांगितलं आहे.

सुकेश चंद्रशेखरनं दिलेल्या माहितीद्वारे काही ठिकाणी शोध घेतला तेव्हा इडीला 16 महागड्या गाड्या मिळाल्या. ज्यातल्या काही सुकेशची बायको लीना हिच्या कंपनीच्या नावावर होत़्या तर काही वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर होत्या. बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आणि नोरा फतेही यांची याच प्रकरणात इडीनं चौकशी केली आहे. दोघींनाही सुकेश चंद्रशेखर यानं महागडे, कोट्यावधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. तसंच जामिनावर बाहेर असताना सुकेश जॅकलीनला भेटलाही होता, ते दोघं एकाच हॉटेलात थांबले होते.

Web Title: Sukesh Chandrasekhar Jacqueline Fernandez Enforcement Directorate Investigation Other Celebrities Names In Charge Sheet Entertainment Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top