esakal | मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; हार्बर मार्गावर विशेष ट्रेन सुरू राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; हार्बर मार्गावर विशेष ट्रेन सुरू राहणार

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत उद्या (ता. 8) विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी भागांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; हार्बर मार्गावर विशेष ट्रेन सुरू राहणार

sakal_logo
By
प्रशांत कांबळे


मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत उद्या (ता. 8) विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी भागांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल विभागात विशेष गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4.30 या वेळेत ट्रान्स हार्बर, मेन लाईन मार्गे प्रवास करण्याची परवानगी राहील.

हेही वाचा - मुंबईतील कोव्हिड बेड कमी होण्याची शक्‍यता; रुग्णसंख्या घटल्याने खासगी रुग्णालयांचा विचार

कुठे- ठाणे-कल्याण अप व डाऊन जलद मार्गावर 
कधी
- सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 
परिणाम- सीएसएमटी येथून सकाळी 9.37 ते दुपारी 2.48 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील 
सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे-कल्याणदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. त्यासोबतच कल्याण येथून सकाळी 10.26 ते दुपारी 3.19 पर्यंत सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा कल्याण-ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा कल्याण-ठाणेदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबून पुढे मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील व आपल्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. 

हेही वाचा - नेस्कोत कोरोना रुग्णांना मानसिक आधार; ऑनलाईन समुपदेशन

कुठे- कुर्ला-वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर 
कधी
- सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 
परिणाम- सीएसएमटी येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 या वेळेत सुटणाऱ्या बेलापूर, पनवेल, वाशीसाठीच्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 या वेळेत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील
----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top