
मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पुढाकारातून 'संडे स्ट्रीट'हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. रस्त्यावर उतरून मनोरंजन, योग, स्केटींग, सायकलिंगसह सांस्कृतिक उपक्रमांचा लाभ घेता यावा यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून २७ मार्चपासून दर रविवारी 'संडे स्ट्रीट' हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. रविवारी सकाळी ६ ते १० या मुंबईतील विविध ठिकाणचे सहा या उपक्रमासाठी राखीव ठेवले गेले होते. मुंबईकरांचा संडे स्ट्रीटला वाढता प्रतिसाद पाहता आता यामध्ये आणखी ३ मार्गांची वाढ करण्यात आल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी ट्वीटच्या माध्यमातून सांगितले आहे. (Sunday Street includes three new lanes; Nine roads open for Mumbai Citizen)
मुंबई पोलीस (Police Commissioner) आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "आता संडे स्ट्रीटचे स्वरूप वाढले आहे. या रविवारी म्हणजेच 3 एप्रिलला नऊ ठिकाणी... आम्ही मुंबई पोलीस तर असणारच, आमचा बॅण्डही असेल आणि आपण सर्वांनी यावे आणि येणारे रविवार संडे फंडे बनवूया."
मुंबईकरांसाठी तणावमुक्त करण्यासाठी हे नऊ रस्ते होणार उपलब्ध:
संडे स्ट्रीट पूर्वीपासून उपलब्ध असणारे सहा रस्ते-
मरीन ड्राईव्ह- दोराभाई टाटा रोड, नरीमन पॉईंट
गोरेगाव-माईंडस्पेसमागील रस्ता
डीएननगर - लोखंडवाला मार्ग
मुलुंड- तानसा पाईपलाईन
विक्रोळी- पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी ब्रीज
वांद्रे- कार्टर रोड
मुंबईकरांसाठी या तीन रस्ते संडे स्ट्रीटसाठी उपलब्ध असणारे तीन रस्ते-
चेंबूर- चिमनी गार्डन (अलॉयसिस सोर्स मार्ग)
एम.एच.बी.कॉलनी-आयसी कॉलनी दहिसर पश्चिम वायसीएम गार्डन
समता नगर- ठाकूर व्हीलेज इएमपी सर्कल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.