सुनेत्रा पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या वाटेवर; सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

NCP Salim Sarang: अजित पवार यांचे विश्वासू सलीम सारंग भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अल्पसंख्याक समाजातील प्रभावी चेहरा मानल्या जाणाऱ्या सलीम सारंग यांच्या संभाव्य निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.
NCP Salim Sarang

NCP Salim Sarang

ESakal

Updated on

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (यूबीटी) खासदारांनी केलेल्या बंडामुळे राजकारण तापले आहे. पावसाळी अधिवेशनापर्यंत लोकसभेत एनडीए सरकारचे संख्याबळ ३६० पर्यंत पोहोचू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सगळ्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या दिल्ली दौऱ्याने महाराष्ट्रातील उत्साह वाढवला आहे. बंडाचे वादळ बारामतीपर्यंत पोहोचेल का, याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता सुनेत्रा पवारांनी मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com