

Sunil Bhusara Wins Maharashtra Tribal Development Corporation Director Election
Sakal
मोखाडा : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक मंडळ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार सुनील चंद्रकांत भुसारा हे ठाणे पालघर मतदारसंघातून 108 पैकी 95 मते मिळवत या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. तर त्यांच्या खालोखाल ९० मते मिळवत दिलीप पटेकर यांनी ही विजय मिळवला आहे. तर जिजाऊ पुरस्कृत आणि भाजप पॅनल मध्ये सामील असलेले चिंतामण विलात यांना 16 तर विनोद शिंदा यांना केवळ 4 मते मिळाली आहेत.