सुनील वारे यांच्या बार्टी महासंचालक पदाचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

barti organisation

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे (बार्टी) येथे महासंचालक पदावर नियुक्त होण्यासाठी पुन्हा एकदा सुनील वारे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Barti : सुनील वारे यांच्या बार्टी महासंचालक पदाचा मार्ग मोकळा

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे (बार्टी) येथे महासंचालक पदावर नियुक्त होण्यासाठी पुन्हा एकदा सुनील वारे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याविरोधात मॅटमध्ये दाखल करण्यात आलेली याचिका आज मागे घेण्यात आली आहे.

सुनील वारे यांची मागील महिन्यात बार्टीच्या महासंचालक पदावर प्रतीनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्या नियुक्तीविरोधात विद्यमान महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती, त्यावर वारे यांच्या नियुक्तीला स्टे देण्यात आला होता. मात्र, आज गजभिये यांनी आपली मॅटमधील याचिका मागे घेतल्याने वारे यांच्या बार्टीच्या महासंचालक पदाच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर गजभिये हे आपोआप महासंचालक पदावरून कार्यमुक्त झाले आहेत.

दरम्यान, धम्मज्योती गजभिये यांना कार्यमुक्त करण्यात येत असल्याने सुनील वारे यांनी तात्काळ महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारावा असे मॅटने आपल्या निर्णयात म्हटले आहे. वारे हे रेल्वे मंत्रालयात विजीलंस क्लिअरन्स या विभागात मोठ्या पदावर कार्यरत होते. त्यानंतर रेल्वेच्या लेखा विभागात ही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.

कामकाजातील पारदर्शकता ही त्यांच्या कामाची ओळख आहे. त्यांच्या माध्यमातून बार्टीच्या कामकाजात सुधारणा होऊन त्यासाठी असलेल्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचतील यासाठी त्यांची २३ जानेवारी रोजी सरकारकडून नियुक्ती करण्यात होती.

टॅग्स :MumbaipostPetition