Superfast Railway : राज्यातील १८ रेल्वे गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द; महानगरी, जनशताब्दी, प्रगतीसह १८ गाड्यांचा समावेश

वेगवान प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या १८ गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा काढण्यात येणार आहे.
Superfast Railway

Superfast Railway

esakal

Updated on: 

- नितीन बिनेकर

मुंबई - वेगवान प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या १८ गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा काढण्यात येणार आहे. यामध्ये सीएसएमटी-बनारस महानगरी, सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी आणि सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेससारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नऊ जोड्यांतील या गाड्यांची नॉन-सुपरफास्ट म्हणून पुनर्वर्गवारी करण्यात येणार असून, १ जानेवारी २०२७ पासून त्यांना नवीन क्रमांक दिले जातील. मात्र, सुपरफास्ट दर्जा काढल्यानंतर प्रवाशांच्या तिकीटदरात कपात होणार आहे.

Loading content, please wait...