Axe Attack
sakal
तारापुर - डहाणू तालुक्यातील सरावली परिसरात अंधश्रद्धा आणि करणीच्या संशयातून शेजारी राहणाऱ्या दांपत्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिच्या पतीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.