नवी मुंबईत निवडणुकांपूर्वी 'लिंबू मिरचीचा खेळ चाले'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

वाशी : एप्रिल महिन्यात महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठीची प्रभागरचनेची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना उकळ्या फुटू लागल्या आहेत. पक्षाकडून तिकीट मिळाले तर ठीक; नाही तर अपक्ष लढण्याची अनेकांनी तयारी केली आहे. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते, असे म्हटले जाते. निवडणुकीलाही काही जण युद्धाची उपमा देत असल्याने, काही उमेदवारांनी विविध क्‍लृप्त्या लढविण्यास सुरुवात केली आहेत.

मोठी बातमी -​ "शिवसेनेने ठरवले तर भाजपला मुंबईत फिरणे अशक्‍य"

या युद्धात साम, दाम, दंड, भेद नीती वापरली जात असून, त्यात आता जादूटोणा नीतीचादेखील समावेश झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेरूळ येथील एका इच्छुक उमदेवाराच्या घराबाहेर सकाळी त्याने दरवाजा उघडल्यानंतर एक कापलेला लिंबू, सोबत दोन हिरव्या मिरच्या, हळदीकुंकू आढळून आले आहे. हा उमेदवार पश्‍चिम महाराष्ट्रातील असल्याने एक क्षण चकित झाला. पण थोड्या वेळाने तो सावरला. तर त्या उमेदवाराला तेथील कोकणी व्यक्तींनी आपण त्यावर उतारा काढू, असेदेखील सांगितले. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

मोठी बातमी -​ गणेश नाईकांच्या मैदानात खुद्द अजित पवार सेट करणार फिल्डिंग..

शहरामध्ये लिंबू-मिरची मारण्याचे प्रकार सुरू झाल्याची चर्चा आहे. एखादा उमेदवार किंवा त्याच्या घरातील अशा क्‍लृप्त्यांनी घाबरून जाण्याची शक्‍यात देखील आहे.  

superstitious activities are doen just before navi mumbai municipal corporation election

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: superstitious activities are doen just before navi mumbai municipal corporation election