पासवान यांच्या आठवणींना उजाळा : दलितांना ताठ कणा देणारा एक ताठर माणूस निघून गेला

विनोद राऊत
Thursday, 8 October 2020

मंडल आयोगापासून ते अनेक दलित चळवळीचा चेहरा असलेल्या रामविलास पासवान यांचे महाराष्ट्राशी अतुट नाते होते

मुंबई, ता.8 ; आंबेडकरी चळवळीचे खंदे नेते  रामविलास पासवान यांचे निधन झाले. मंडल आयोगापासून ते अनेक दलित चळवळीचा चेहरा असलेल्या रामविलास पासवान यांचे महाराष्ट्राशी अतुट नाते होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनापासून अनेक चळवळींना त्यांनी सक्रीय पाठींबा दिला.अनेकदा  प्रत्यक्ष आंदोलनात भाग घेण्यासाठी महाराष्ट्रात यायचे. 

घाटकोपरमध्ये पोलिस गोळीबारात 11 दलित कार्यकर्ते शहिद झाले. त्याच्या निषेधार्थ जोगेंद्र कवाडे यांनी आझाद मैदान ते सम्राट असा मोर्चा काढला होता. रामविलास पासवान त्यावेळी केंद्रीय मंत्री होते. मात्र तरीही ते या मोर्चात सहभागी झाले होते. बाबासाहेबांच्या जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्राशी एक वेगळेचं नाते होते. त्यांना समाजाबद्दल कळकळ होती असं जोगेंद्र कवाडे सांगीतले.

रामविलास पासवान यांचे दलित पँथरपासून ते सर्व आंबेडकरी चळवळीशी घट्ट संबध होते. महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी चळवळींच्या मागे ते कायम उभे राहायचे. मुंबईच्या अनेक आंदोलनात ते सक्रीय होते. महाराष्ट्रातून त्यांच्याकडे गेलेल्या कुठल्याही कार्यकर्त्याला, मग तो कुठल्याही गट, तटाचा  असो,त्यांना कायम मदत करायचे. रामविलास पासवान यांच्या जाण्यामुळे उत्तर भारतातील दलित हक्कासाठी लढणारा चेहरा कायमचा गमावला आहे. या शब्दात जेष्ठ साहित्यीक अर्जुन डांगळे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 

सर्वात मोठी बातमी : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात CBI करणार नव्याने तपास, दुसरं पथक मुंबईत दाखल

रामविलास पासवान  हाजीपूर मतदारसंघातून देशातून सर्वाधिक मते मिळून विजयी झाले. दिवंगत पंतप्रधान  जवाहरलाल नेहरुंना एवढी मते मिळाली नाही. याचे कारण सांगतांना जेष्ठ साहित्यीक ज वी पवार सांगतात,   रामविलास पासवान लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न उचलायचे त्यामुळे त्यांच्यावर  पासवान समाजाने जिव ओवाळून टाकला होता. 

5 ऑगस्ट 1991 मध्ये आंध्र प्रदेशातील गुटूर जिल्ह्यात 20 दलितांची सामूहिक हत्या झाली. त्याच्या देहांचे खांडोळी केलेले अवयव, उत्तरीय तपासणीसाठी डॉक्टरांपुढे ठेवले गेले. रामविलास पासवान तेव्हा खासदार होते. ही घटना कळताचं त्यांनी  अख्खी लोकसभा डोक्यावर घेतली होती. आणि सरकारला नोंद घ्यायला भाग पाडले होते. अशी आठवण पवार यांनी काढली. 

रामविलास पासवान यांनी महाराष्ट्रात त्यांचा पक्ष  उभा कऱण्याचा खूप प्रयत्न केला. महाराष्ट्रातील दलित चळवळ ही जात, पोटजातीच्या कोडांळ्यात सापडलेली होती. त्यामुळे त्यांना  मुंबईत किंवा राज्यात तेवढे पाठबळ मिळू शकले अस पवार यांनी सांगीतल. बिहार सारख्या मागासलेल्या प्रांतातून दलितांना ताठ कणा देणारा एक ताठर माणूस निघून गेलाय. त्यांच्या जाण्याने उभ्या देशाच्या दलित चळवळीचे नूकसान झाले आहे. अस पवार यांनी सांगीतले.

पासवान यांच्या निधनाने देशभर लोकप्रिय असलेला  दलितांचा द्रष्टा नेता; संसदीय राजकारणातील दलितांचा लोकप्रिय चेहरा हरपला आहे . भारतीय  राजकीय सामाजिक क्षेत्राचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रामविलास पासवान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनीही, राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पासवान यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली होती, त्यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपल्याबद्दल दुख व्यक्त केल.

( संपादन - सुमित बागुल )

support of dalits ram vilas paswan passes away his memories related to maharashtra and mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: support of dalits ram vilas paswan passes away his memories related to maharashtra and mumbai