esakal | उद्या येणार अयोध्येचा निकाल 
sakal

बोलून बातमी शोधा

उद्या येणार अयोध्येचा निकाल 
  • निकालासाठी अयोध्यानगरी सज्ज
  • सुरक्षादलाच्या 100 तुकड्या होणार तैनात
  • 3 हजार लोकांवर पोलिसांची नजर

उद्या येणार अयोध्येचा निकाल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भारतातील सर्वात महत्त्वाच्या अशा अयोध्येतील विवादित जागेप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्या येणार आहे. उद्या सकाळी 10.30 वाजेपासून निकाल वाचनाला सुरवात होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निकालवाचन करतील. निकालामुळे कोणतीही कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी कडेकोट उपाययोजना केली जातेय

अयोध्येतील निकालाच्या तोंडावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतलीय. निकालामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातायत..

  • प्रशासनानं अयोध्या जिल्ह्याचं रेड, यलो, ग्रीन आणि ब्लू अशा चार झोनमध्ये विभाजन केलंय.
  • त्यात 48 सेक्टर केलेत.. विवादित परिसर रेड झोनमध्ये येतो 
  • एका आदेशावर सर्व अयोध्या सील करता येईल, अशी योजनाही बनवली जातेय..
  • निकालाचा क्षण जवळ येण्याच्या वेळेस निमलष्करी दलाच्या 100 तुकड्या मागवल्या जाणारेत..
  • सोशल मीडियात अफवा किंवा एखाद्या समुदायाविरुद्ध चुकीचा प्रचार करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी तब्बल 16 हजार स्वयंसेवक तैनात केलेत..
  • विशेष म्हणजे कोणताही अनुचित प्रकार रोखण्यासाठी तीन हजार लोकांवर नजर ठेवली जातेय..


अयोध्येतल्या निकालांचे पडसाद देशभर उमटू शकतात. त्या  पार्श्वभूमीवर जास्त गर्दीच्या 78 रेल्वे स्टेशनांची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आलीय. या स्टेशनांमध्ये महाराष्ट्रातील मुंबईसह काही स्थानकं, दिल्ली, उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकांचा समावेश आहे..आरपीएफनं सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्यात.

अयोध्येतल्या नागरिकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंची जमवाजमव सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येचा निकाल काहीही लागो, लोकांच्या मनातलं भय, चिंता, संशय कायमचं जाओ हीच अपेक्षा सामान्य भारतीय नागरिक व्यक्त करतोय.

Webtitle : supreme court to give their verdict on disputed land in ayodhya