"तुमचं कार्यालय वरळीला आहे आणि फ्लोरा फाऊंटन तिथून जवळ आहे" म्हणत सुप्रीम कोर्टाने रिपब्लिकला फटकारलं

"तुमचं कार्यालय वरळीला आहे आणि फ्लोरा फाऊंटन तिथून जवळ आहे" म्हणत सुप्रीम कोर्टाने रिपब्लिकला फटकारलं

मुंबई, ता. 15 : फेक टिआरपी प्रकरणात आज रिपब्लिक टीव्हीला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. तुमचे कार्यालय वरळीला आहे आणि तिथून जवळच फ्लोरा फाऊंटन (हायकोर्ट) आहे, असे सुनावत मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यास सांगितले.

मुंबईत फ्लोरा फाउंटन येथे मुंबई उच्च न्यायालय आहे. फेक टीआरपी प्रकरणात 
मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्सच्या विरोधात रिपब्लिक टीव्हीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  रिपब्लिकच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ज्ञ हरीश साळवे यांनी याचिका केली होती. न्या डॉ धनंजय चंद्रचूड, न्या इंंदू मल्होत्रा, न्या इंदिरा बैनर्जी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचे वार्तांकन करतो म्हणून आकसाने मुंबई पोलिसांनी माझ्यावर कारवाई केली आहे, असा युक्तिवाद यावेळी याचिकादारांकडून करण्यात आला. मात्र न्यायालयाने याचिकेवर कोणतीही सुनावणी घेण्यास नकार दिला. फौजदारी दंड संहितेतील तरतुदीनुसार प्रथम उच्च न्यायालयात याचिका करायला हवी. त्यामुळे इतर नागरिकांप्रमाणेच प्रथम उच्च न्यायालयात याचिका करा, असे खंडपीठ म्हणाले.

उच्च न्यायालयांंवर आमचा विश्वास आहे. कोविड 19 साथीमध्येही उच्च न्यायालयाचे काम सुरु आहे. त्यामुळे याचिकादार चॅनलने उच्च न्यायालयात जावे. तुमचे कार्यालय वरळीला आहे आणि फ्लोरा फाऊंटन ( जिथून हायकोर्ट जवळ आहे ) जवळ आहे, असे खडेबोलही खंडपीठाने सुनावले. मुंबई पोलिस आयुक्त याप्रकरणी माध्यमांमध्ये मुलाखती देत आहेत, असे साळवे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले. यावर, सध्या आयुक्त मुलाखती देत आहेत हे चिंताजनक आहे, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले.

मुंबई पोलिसांनी याचिकेला विरोध केला आहे. पोलिस तपासामध्ये चॅनल वादग्रस्त व्रुत्तांकनद्वारे हस्तक्षेप करीत आहे, असा आरोप पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात केला. साळवे यांनी अखेर न्यायालयाच्या परवानगीने याचिका मागे घेतली. 

मुंबई पोलिसांनी रिपब्लिकसह अन्य दोन मराठी चॅनलवर गुन्हा दाखल केला आहे. रिपब्लिकच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना समन्स पाठविले आहे. रिपब्लिकचे अर्णब गोस्वामी चर्चासत्र करून तपास आणि साक्षीदार प्रभावित करतात, असे पोलिसांनी म्हटले आहे.

supreme court to republic tv file petition in bombay high court its closer to your worli office

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com