esakal | ड्रग्स प्रकरण : पोलिस थेट सर्च वॉरंट घेऊन आलेत आणि विवेक ओबेरॉयच्या जुहूच्या घरात सुरु झाला तपास
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रग्स प्रकरण : पोलिस थेट सर्च वॉरंट घेऊन आलेत आणि विवेक ओबेरॉयच्या जुहूच्या घरात सुरु झाला तपास

विवेक ओबेरॉयचा मेव्हणा आदित्य अल्वा सँडलवूड ड्रग्ज स्कँडल प्रकरणात फरार आहे

ड्रग्स प्रकरण : पोलिस थेट सर्च वॉरंट घेऊन आलेत आणि विवेक ओबेरॉयच्या जुहूच्या घरात सुरु झाला तपास

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : मुंबईत सध्या चर्चा आहे ती बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनची. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया आणि तिच्या मोबाईलमधील चॅट्सच्या माध्यमातून हे सारं प्रकरण समोर आलंय. अशात केवळ बॉलिवूडमध्येच ड्रग्सचं सेवन केलं जातं आणि त्याचे व्यवहार होतात असं अजिबात नाही. याच पार्श्वभूमीवर आणि ड्रग्स प्रकरणात मुंबईतून मोठी बातमी समोर येतेय. ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधील आणखी एका बड्या अभिनेत्याच्या घरावर आज धाड टाकण्यात आली आहे. सँडलवूड ड्रग्ज स्कँडल प्रकरणात विवेक ओबेरॉय या अभिनेत्याच्या मुंबईतील घरावर आज धाड टाकण्यात आली. विवेक ओबेरॉयचा मेव्हणा आदित्य अल्वा सँडलवूड ड्रग्ज स्कँडल प्रकरणात फरार आहे. या पार्श्वभूमीवर आज बंगळुरू पोलिसांनी मुंबईतील विवेक ओबेरॉयच्या घरात तपास केलाय.    

महत्त्वाची बातमी : मुंबईवर पुढील महिन्यात मोठ्या संकटाची शक्यता, कोविड किट सदोष निघाल्याने मोठा तुटवडा येणार ?

विवेक ओबेरॉयचा मेव्हणा आदित्य अल्वा सँडलवूड ड्रग्ज स्कँडल प्रकरणात फरार आहे. याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी बंगळुरू पोलिस आज मुंबईत दाखल झालेत. आदित्य अल्वा विवेक ओबेरॉयच्या घरात लपून बसला असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. म्हणूनच त्यांनी विवेक ओबेरॉयच्या घरात तपास सुरु केलाय. या प्रकारात बंगळुरू पोलिसांनी सर्च वॉरंट सोबत देखील आणला होता. विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील जुहूच्या घरी आज दुपारी दोन वाजल्यापासून हा तपास सुरु झाला. 

कोण आहे आदित्य अल्वा ? 

आदित्य अल्वा हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा. जीवनराज अल्वा यांची मुलगी प्रियांका अल्वा म्हणजे विवेक ओबेरॉयची बायको. आदित्य हा प्रियांकाचा भाऊ आहे. प्रियांका आणि विवेक ओबेरॉय यांचं लग्न २०१० मध्ये झालंय. आदित्य अनेक पेज थ्री पार्टीमधील नावाजलेला चेहरा. मात्र सँडलवूड ड्रग्ज स्कँडल प्रकरणानंतर आदित्य अल्वा गायब आहे. त्याविरोधात शोधमोहीम देखील राबवली जातेय. आदित्य विरोधात लूक आउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे. 

महत्त्वाची बातमी :  राज्यात 'खरे हिंदुत्व' दाखवत मदरसे बंद करून शिष्यवृत्ती द्या: अतुल भातखळकर

सध्या बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनची सर्वत्र चर्चा आहे. अशात कन्नड सिने इंडस्ट्रीत देखील अभिनेते आणि अभिनेत्र्या ड्रग्स घेत असल्याची आणि ड्रग्सचे व्यवहार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सँडलवूड ड्रग्ज स्कँडल उघड झालेलं.