..अन् 'त्या' गरीब कुटूंबाच्या मदतीसाठी धावल्या सुप्रिया सुळे ; घाटकोपर मध्ये अडकले होते सोलापूरचे कुटूंब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

राजस्थान सरकारने घाटकोपर येथे सोडल्यानंतर सोलापूर जाण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने अडकलेल्या एका गरीब कुटूंबीयांच्या मदतीसाठी खासदार सुप्रीया सुळे धाऊन आल्या आहे.

मुंबई: राजस्थान सरकारने घाटकोपर येथे सोडल्यानंतर सोलापूर जाण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने अडकलेल्या एका गरीब कुटूंबीयांच्या मदतीसाठी खासदार सुप्रीया सुळे धाऊन आल्या आहे. सुळे यांचे स्विय सहाय्यक सुरेश पाटील यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी चर्चा करून या कुटूंबाबद्दल माहिती देताच, आंध्रप्रदेश राज्यात जाणाऱ्या एसटीच्या माध्यमातून त्यांना सुरक्षीत सोलापूर येथे पोहचवण्यात आले आहे. 

मुळ सोलापूरचे रहिवासी असलेले अनिल अवघडे आपल्या कटूंबासह सुमारे सव्वा दोन महिन्यापुर्वी लग्नाच्या निमित्ताने राजस्थान गेले होते. मात्र, ऐन परतीच्या प्रवासाच अचानक लाॅकडाऊनची घोषणा झाली. त्यामूळे अवघडे राजस्थान येथील उदयपूर येथे अडकले होते. 

हेही वाचा: ..अन 'त्यानं' ट्रेनच्या डब्यातच सोडले प्राण; अन्न-पाण्याशिवाय धावतायेत श्रमिक ट्रेन.. 

दरम्यान चौथ्या लाॅकडाऊनंतर राजस्थान सरकारने विविध राज्यात एसटीचे नियोजन केले. दरम्यान अवघडे कुटूंबीयांना राजस्थान सरकारच्या एसटीने घाटकोपर येथे सोडले, त्याप्रमाणेच घाटकोपर येथून सोलापूरसाठी प्रवासाची सुविधा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र सायंकाळी पाच वाजता घाटकोपर येथे पोहचल्या नंतर वाहनांची सुविधा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

खाण्यापिण्यापुरते खिशात पैसे, चार महिला दोन पुरूष आणि एक मुलगा असे नऊ जणांचे कुटूंब घाटकोपरच्या एका पादचारी मार्गांवर बसून काहीतरी वाहन मिळेल याची वाट पाहत असतांना, खासदार सुप्रीया सुळे यांना या कुटूंबाची माहिती मिळताच, त्यांच्या स्विय सहाय्यकांच्या माध्यमातून एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याशी चर्चा केली. दरम्यान चन्ने यांनी सकारात्मक आणि माणूसकीचा हात पुढे करत, एसटीचे राज्यांतर्गत प्रवासाचे धोरण नसतांनाही आंध्रप्रदेश जाणाऱ्या एसटीच्या माध्यमातून या गरीब कुटूंबाला सोलापूर येथे सुखरूप मोफत प्रवासाची सोय करून दिली. 

हेही वाचा: अरे वाह! 1 महिना 6 दिवसांच्या बाळाने केली कोरोनावर मात; डॉक्टरांनी टाळ्या वाजवत दिला निरोप

"खिशात पैसे नव्हते, प्रवासाची सोय नव्हती, तेवढ्यात एका नातेवाईकाने खासदार सुप्रीया सुळेंच्या पिएंचा नंबर दिला, त्यांनी 10 मिनीट थांबायला सांगितले, त्यानंतर काही वेळातच आम्हाला सोलापूर जाण्याची सोय करून देण्यात आल्याने सुरक्षीत घरी पोहचू शकलो, हे उपकार कधीच न फेडण्यासारखे आहे", असं अनिल अवघडे यांनी सोलापूरला सुखरूप पोहोचल्यानंतर म्हंटलंय. 

supriya sule helps poor family from solapur to reach their home read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya sule helps poor family from solapur to reach their home read full story