Supriya Sule : फोडाफोडीच्या राजकारणाला थारा नाही, अमित शहा यांचे वक्तव्य दुर्दैवी; सुप्रिया सुळे

‘‘देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी साम, दाम, दंड, भेद विसरून विरोधी पक्ष आणि बूथ पातळीवरील कार्यकर्ते फोडून सत्ता आणण्याचे आवाहन केले आहे.
Supriya Sule over Amit Shah statement maharashtra politics assembly election
Supriya Sule over Amit Shah statement maharashtra politics assembly electionsakal
Updated on

मुंबई : ‘‘देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी साम, दाम, दंड, भेद विसरून विरोधी पक्ष आणि बूथ पातळीवरील कार्यकर्ते फोडून सत्ता आणण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे. महाराष्ट्र अशा फोडाफोडीच्या राजकारणाला थारा देणार नाही,’’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री शहा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

महात्मा गांधी जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंत्रालयाशेजारील महात्मा गांधी पुतळा ते लाल बहाद्दूर शास्त्री पुतळा अशी पदयात्रा बुधवारी काढली. यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

पदयात्रेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार वर्षा गायकवाड, आमदार राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार व ‘राष्ट्रवादी’, काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, ‘‘भाजपची विरोधी पक्षांना संपविण्याची भाषा ही गांधी विचारांना तडा देणारी आहे. विरोधी पक्षांना संपवणे, हे भाजपचे कटकारस्थान आहे. जुना भाजप पक्ष हा सुसंस्कृत होता. मात्र आताच्या भाजपकडून मित्र पक्षांना आधी संपवले जाते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. महाराष्ट्रातील राजकारण अदृश्य शक्तीच्या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र अशा राजकारणाला थारा देणार नाही.’’

जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत राज्याच्या कारभारावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मुंबईत मोर्चाचे आयोजन केले होते.

निष्क्रिय सरकारमुळे समाजात निर्माण झालेला असंतोष, माता -भगिनींवर होत असलेली हिंसा, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, बेरोजगारी, प्रचंड भ्रष्टाचार यामुळे लोक त्रस्त आहेत. महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. या अन्यायाविरोधात आम्ही उभे ठाकलो आहोत.’’

अमित शहा विरोधकांना संपवून सत्ता मिळवण्याची भाषा करत आहेत. कारण त्यांचा राज्यघटनेवर विश्वास नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत जेवढे सत्तेला महत्त्व दिले, तेवढेच विरोधकांनाही महत्त्व दिले आहे. मात्र ते त्यांना मान्य नाही.

- सुप्रिया सुळे, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com