esakal | पार्थ यांची आदल्यादिवशीच झाली होती भेट, सुप्रिया सुळेंनी टाकला होता इंस्टावर 'तो' फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

पार्थ यांची आदल्यादिवशीच झाली होती भेट, सुप्रिया सुळेंनी टाकला होता इंस्टावर 'तो' फोटो

सुप्रिया सुळे यांचा सोशल मीडियावरील एक फोटो चांगलाच व्हायरल होतोय. हा फोटो सुप्रिया सुळे यांनी परवा रात्री, म्हणजेच ११ तारखेला मंगळवारी रात्री सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

पार्थ यांची आदल्यादिवशीच झाली होती भेट, सुप्रिया सुळेंनी टाकला होता इंस्टावर 'तो' फोटो

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : कालचा दिवस महाराष्ट्रातील राजकारणासाठी वेगळा होता. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले नातू पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी केलेली CBI चौकशीची मागणी अपरिपक्व असल्याचं मत मांडलं. पार्थ पवार यांच्या मताला कवडीचीही किंमत देत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. स्वतः शरद पवार यांनी असं मत मांडल्यानंतर साहजिकच राजकीय चर्चांना उधाण आलं.

यानंतर (बुधवार, १२ ऑगस्ट) काल संध्याकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजेच सिल्व्हर ओक वर राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्यात बैठक झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. 

महत्त्वाची बातमी - आजोबांनी पार्थ पवारांना फटकारलं, काकांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

कालच्या या सर्व प्रकरणानंतर आता सुप्रिया सुळे यांचा सोशल मीडियावरील एक फोटो चांगलाच व्हायरल होतोय. हा फोटो सुप्रिया सुळे यांनी परवा रात्री, म्हणजेच ११ तारखेला मंगळवारी रात्री सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

यामध्ये सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार पाहायला मिळतायत. पार्थ पवार यांनी सेल्फी फोटो काढलाय. सुप्रिया सुळे यांनी यांच्या स्वतःच्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करत त्याखाली 'चिलिंग विथ पार्थ' असं कॅप्शन टाकलंय.

दरम्यान पार्थ पवारांनी परवा रात्रीच म्हणजेच ११ तारखेला रात्री शरद पवारांचीही भेट घेतल्याचीही माहिती समोर येतेय. 

supriya sule shared photo with parth pawar caption was chilling with parth