सुप्रिया सुळे का म्हणतायत, 'आपली काळजी घ्या'..

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

महाराष्ट्रातील राजकीय पटलावर अनेक मोठ्या घडामोडी घडतायत. अत्यंत वेगवान पद्धतीने या सर्व घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. अशातच या सगळ्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांचा घोळका हा कायमच सर्व राजकीय नेत्यांच्या आजू बाजूला रात्रं दिवस आहे. सर्वात आधी आपल्याला बातमी मिळावी, सर्वात Exclusive फोटो, किंवा सर्वात Exclusive व्हिडीओ आपल्याच चॅनलला मिळावे म्हणून पत्रकार रात्रीचा दिवस करताना पाहायला मिळतायत.

अशातच पत्रकारांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट फेसबुकवर शेअर केलीये. ही पोस्ट आहे माध्यमांमध्ये काम करणाऱ्या मित्र-मैत्रिणींसाठी. या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी आपली काळजी व्यक्त केली आहे. 

माध्यमातील मित्र- मैत्रिणींनो, ब्रेकींग न्यूजचं महत्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्वाची आहे. मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या. असं सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये नमूद केलंय.

दरम्यान या माध्यमातून आता सुप्रिया सुळे यांची काळजी व्यक्त करणारी बाजू समोर आली आहे. 

WebTitle : supriya sule writes a emotional post for all the people working in media

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya sule writes a emotional post for all the people working in media