मुंबई महापालिका निवडणुकीत नवा भिडू ; मतांचे गणित बिघडवणार

BMC
BMCsakal media

मुंबई : सुरत महानगरपालिकेत (surat municipal) 27 नगरसेवक निवडून आल्यानंतर आता आम आदमी पार्टीने (aam aadmi party) मुंबई महानगरपालिकेवर (bmc) लक्ष केले आहे. दिल्लीत मुस्लिम मतदारांनी (muslim voters) आपला चांगली साथ दिली. तर,आता मुंबईत गुजराती मताची मोळ (Gujrati voters) बांधण्यासाठी आजपासून गुजराती सेल सुरु करण्यात आला आहे.

BMC
मुंबई विद्यापीठाला मिळणार पूर्ण वेळ कुलसचिव

दिल्लीत सलग दुसऱ्या वेळेला विक्रमी विजय मिळवल्यानंतर आपने आता देशभरात पक्षांची मुळं रुजविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.मुंबई महानगर पालिका निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून काही दिवसांपुर्वी आपने फोर्ट परीसरात कार्यालय सुरु केले होते.त्यानंतर आज गुजराती सेलची स्थापना केली आहे.त्यासाठी खास सुरत महानगर पालिकेतील आपचे नगरसेवकही हजर होते.

सुरत महानगर पालिकेत 120 पैकी 27 प्रभागात आपचे नगरसेवक निवडून आले आहेत.त्यामुळे मुंबईतील गुजराती मतदारांचा आकर्षित करण्यासाठी आता नवे प्रयोग केले जात आहे.तर,दिल्लीत मुस्लिम मतदारांनी एकगठ्ठा मते दिली आहेत.त्यामुळे मुंबईतही मुस्लिम मतदारांची साथ मिळवण्याचा प्रयत्न आप कडून केला जाणार आहे."आम आदमी पार्टीने गुजराती समाजाशी जुळण्यासाठी गुजराती विंगची स्थापना केली आहे'.असे ट्‌वीट पक्षाचे मुंबईतील कार्याध्यक्ष व्दीजेंद्र तिवारी यांनी केले आहे.

म्हणून मतांचे गणित बिघडवणार

आप मुंबईच्या निवडणुकीत सुरत मधील नगरसेवकांना उतरवणार असल्याचे निश्‍चित आहे.त्यामुळे गुजराती समाज काही प्रमाणात जरी आप कडे वळल्यास त्याचा फटका भाजपला बसणार.गुजरात समाज हा भाजपचा हक्काचा मतदार आहे. मुस्लिम मतदारांनी आप ला साथ दिली आहे.मुंबईतील मुस्लिम मतदारही आप कडे वळाल्यास त्याचा थेट फटका कॉंग्रेसला बसेलच त्याच बरोबर शिवसेनेलाही बसू शकतो.शिवसेना महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या निमीत्ताने नवी व्होट बॅंक तयार करण्यासाठी मुस्लिम मतदारांकडे पाहात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com