Bhiwandi Lok Sabha Election : जनाची नाहीतर मनाची लाज... माविआचे उमेदवार म्हात्रेंची कपिल पाटीलांवर सडकून टीका

महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर सडकून टिका केली आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha Electionesakal

डोंबिवली : बदलापूर रेल्वे स्थानकात एका होम प्लॅटफॉर्मचे काम व्हायला इतकी वर्षे लागतात. आज ही ते काम पुरणावस्थेत नाही. येथील मतदारांच्या जीवावर खासदार, केंद्रीय मंत्री झालात आणखी काय पाहिजे असे म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर सडकून टिका केली आहे. म्हात्रे यांनी शनिवारी कल्याण ते बदलापूर रेल्वे प्रवास करत रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. रेल्वे स्थानकांच्या पाहणी नंतर त्यांनी विरोधी उमेदवारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी शनिवारी कल्याण ते बदलापूर लोकलने प्रवास केला. त्यानंतर बदलापूर स्टेशनची पाहणी त्यांनी करत प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या. काही दिवसांपूर्वीच खासदार कपिल पाटील यांनी देखील बदलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यानंतर सुरेश म्हात्रे यांनी पाहणी करत येथील समस्यांवरून कपिल पाटील यांच्यावर टीका केली आहे.

सुरेश म्हात्रे म्हणाले, आज बदलापूर रेल्वे स्टेशनला आम्ही सर्वजण प्रवाशांशी संवाद साधत होतो. अतिशय वाईट अवस्था आणि वाईट अनुभव मला या रेल्वे स्टेशनवर आला. महिला प्रवाशांशी मी बोललो त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे महिलांसाठी स्वतंत्र रेल्वे असावी. तेवढं नसेल तर महिलांसाठी डब्बा कुठेतरी वाढवण्यात यावा. बदलापूर स्थानकातुन 15 मिनिटाच्या अंतरावर लोकल सोडण्यात याव्यात. येथे एकच स्वच्छता गृह असून त्या स्वच्छता गृहाची अवस्था बिकट आहे.

Lok Sabha Election
Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

होम प्लॅटफॉर्म गेल्या 10 वर्षात पाटील यांना ते बांधकाम पूर्ण करता आले नाही. दीड दोन महिन्यांपूर्वी त्याचे उद्घाटन झाले पण त्याची अवस्था पहा निष्क्रिय काम दिसून येत आहे. हे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते ते हे सहज पूर्ण करु शकले असते पण त्यांची मानसिकता नाही. महिलांचा आक्रोश आज पाहीला. त्यांची वाईट अवस्था होत आहे. लोकल पकडताना खरं म्हणजे जनाची नाही तर मनाची लाज या खासदाराना, या केंद्रीय मंत्र्याना वाटायला हवी. कारण तुम्ही आज या लोकांच्या मतदानावर खासदार झाले, दीड वर्ष केंद्रीय मंत्री आहात. आणखी काय पाहिजे? तरी सुद्धा तुम्ही एक साधं प्लॅटफॉर्मचा काम करू शकले नाही.

फेऱ्या वाढवायच तर सोडा, महिला डब्यांचा प्रश्न सोडा, एक साधं प्लॅटफॉर्मचा काम हे दहा वर्षात करू शकले नाही. अशा प्रकारचे हे निष्क्रिय खासदार आपल्या समोर आहेत. मी माझ्या वतीने, तसेच सर्व सामान्य जनतेच्या वतीने मी त्यांचा निषेध करतो. अशा प्रकारचे जे काम आहे ते शंभर टक्के चुकीचा आहे अशा शब्दांत म्हात्रे यांनी पाटील यांच्या कामावर टिका केली आहे.

Lok Sabha Election
Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com