मास्कच्या किंमती वाढल्या; पण कोणाचीही तक्रार नाही! जाणून घ्या काय आहे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 1 June 2020

अनेक ठिकाणी मास्कच्या चढ्या किंमतीस विक्री होत असल्याच्या तक्रारी खाजगीत केल्या जात आहेत, पण त्याची अधिकृत तक्रार कोणीच केली नसल्याचे सांगितले जात आहे.

 

मुंबई ः दोन तसेच तीन स्तरीय मास्कच्या किंमतीवर सरकारने निर्बंध घातल्यानंतरही त्याची अनेक ठिकाणी चढ्या किंमतीस विक्री होत असल्याच्या तक्रारी खाजगीत केल्या जात आहेत, पण त्याची अधिकृत तक्रार कोणीच केली नसल्याचे सांगितले जात आहे. मार्चमध्ये महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर मास्कच्या किंमती 400 टक्क्यांनी वाढल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने दोन पट्ट्यांच्या मास्कसाठी 8 रुपये तर तीन पट्ट्यांच्या मास्कसाठी 22 रुपये आकारण्याची सूचना केली. 

जिद्दीला सलाम! मुंबईतील तब्बल 'इतक्या' पोलिसांनी केली कोरोनावर मात....

मास्कची किमत जास्त आकारल्याबद्दल महाराष्ट्रात सात ठिकाणी कारवाई करण्यात आली, पण त्यात मुंबईचा समावेश नाही. आम्हाला मुंबईतून याबद्दलची एकही तक्रार आलेली नाही. ठाण्यातून आलेल्या एका तक्रारीनुसार आम्ही कारवाई केली आहे, असे आधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनावर उपचार होत असलेल्या रुग्णालयांशेजारील काही दुकानात मास्क चढ्या किंमतीस विक्री केले जात असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी तर मास्कच्या किंमती 50 रुपये असल्याचे सांगितले जाते.

मुंबईकरांनो सावधान ! ३ जूनला चक्रीवादळ महाराष्ट्र किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

जानेवारीपर्यंत सर्जिकल मास्क दोन रुपयास मिळत होता. त्यानंतरही त्याच्यावरील किंमतीची मर्यादा मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी होत नाही. सिंगापूरमध्ये मास्कचे मोफत वाटप होत आहे, याकडे अंजनी दमानिया यांनी लक्ष वेधल्याचे वृत्त आहे. सर्वसामान्य नागरीकच नव्हे तर रुग्णालयात काम करणाऱ्यांनाही मास्क खरेदीसाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे. काही नर्सनी महिन्याचा मास्क खरेदीवरील खर्च दोन हजारपर्यंत गेल्याचे सांगितले आहे. एन 95 मास्कच्या किंमती तर जास्तच आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: surgical masks sold at inflated rates in mumbai despite price cap by centre