जिद्दीला सलाम! मुंबईतील तब्बल 'इतक्या' पोलिसांनी केली कोरोनावर मात.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

 कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झालेल्या मुंबई पोलिस दलातील 472 पोलिसांनी आतापर्यत कोरोनावर मात केली आहे. त्यातील बहुसंख्य पोलिस कामावर रुजू झाल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

जिद्दीला सलाम! मुंबईतील तब्बल 'इतक्या' पोलिसांनी केली कोरोनावर मात....

मुंबई: कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झालेल्या मुंबई पोलिस दलातील 472 पोलिसांनी आतापर्यत कोरोनावर मात केली आहे. त्यातील बहुसंख्य पोलिस कामावर रुजू झाल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

मुंबई पोलिस दलातील 214 अधिकारी व 1176 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सुखद बाब म्हणून त्यातील 472 पोलिस कोरोनामुक्त होऊन झाले आहेत. त्यातील बहुसंख्य पोलिस पुन्हा सेवेत रुजू झाले आहे. कोरोनामुक्त झालेले बरेचसे पोलिस कोरोनाविरोधातील लढ्यातील त्यांचे अनुभव इतर कर्मचा-यांना सांगत आहेत. तसेच  कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांनी अशा पोलिसांच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना धीर दिला जात आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! यावर्षी 'अशी' असणार बाप्पाची मूर्ती..परळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय

सध्या राज्यातील एक हजार 421 कोरोनाग्रस्त पोलिसांवर विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयात  तसेच इतर ठिकाणी उपचार सुरु आहेत.तर सुमारे सात हजार पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनामुळे आतापयर्यंत राज्यात 26 पोलिसांना आपले जीव गमवावे लागले आहे. मुंबईतही 13 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तसेच राज्यात पोलिसांच्या मदतीला केंद्रीय पथके दाखल करण्यात आली आहेत. मात्र या पथकातील जवान देखील कोरोनाच्या कचाट्यातुन सुटले नाहीत. आतापर्यंत 22 जवानाना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.  याशिवाय मुंबईतील राज्य राखीव पोलिस दलाच्या 70 जवानांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यात पाच अधिका-यांचा समावेश आहे.

हेही वाचा: ''मला गर्भपाताची परवानगी द्या'' ; कोणी केली मागणी?..वाचा.. 

राज्यातील दोन हजारांहून अधिक पोलिसांना कोरोना झाला आहे. तसेच संशयीत रुग्णाच्या संपर्कात आलेले सात हजार पोलिस विलगीकरणात आहेत. याशिवाय 55 वर्षावरील पोलिसांना सुटीवर पाठवण्यात आले आहे. तसेच 50 वयोगटावरील पोलिसांना कमी जोखीमीचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी सध्या 10 हजार होमगार्ड, 1200 केंद्रीय सुरक्षा जवान देण्यात आले आहेत.

472 police in mumbai have defeat corona read full story

loading image
go to top