मोठ्या दूर्घटनेनंतर महाड नगरपालिकेला आली जाग! शहरातील 304 इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण

सुनिल पाटकर
Wednesday, 16 September 2020

  • महाड शहरातील 304 इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण
  • 106 इमारतींच्या दुरुस्तीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर

महाड: महाड शहरातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळल्यानंतर महाड नगरपालिकेने शहरातील 303 इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये 106 इमारतींची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या क्वांरटाइन संदर्भात मोठी अपडेट, पालिकेनं बदलला नियम

24 ऑगस्टला झालेल्या तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत 16 जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे झाले. शहरातील धोकादायक इमारती शोधण्याचे काम महाड नगरपालिकेकडून युद्धपातळीवर सुरू केले. त्यात पालिकेच्या बांधकाम विभागातर्फे शहरातील इमारतींची तपासणी करण्यात आली. यासाठी पालिकेने विशेष पथकाची नेमणूक केली होती. या पथकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील एकूण 304 घरांची तपासणी पूर्ण झाली आहे. यात 25 बैठी घरे, त्याचप्रमाणे सात इमारती धोकादायक निदर्शनास आल्या असून, 173 इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि 106 इमारतींची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केल्याचे पालिकेचे कनिष्ठ अभियंता सुहास कांबळे यांनी सांगितले.

भाजपचा रुग्णांच्या जीवाशी खेळ! रुग्णांना फळे देऊ केल्याने कॉंग्रेसचा आरोप

13 अतिधोकादायक इमारती
पालिका प्रशासनाने 13 अतिधोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्याचे काम केले असून, त्यावर कारवाई करण्यास सुरुवातही केली आहे. त्यात अल कासिम इमारतीमधील सर्व रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील अन्य इमारतींचा स्ट्रक्चर ऑडिटचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. पुढील आदेश आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Survey of 304 buildings completed in Mahad city