धक्कादायक खुलासा ! रिया आणि सुशांतने बनवला होता एक खास WhatsApp ग्रुप, चर्चा व्हायची ड्रग्सची

सुमित बागुल
Tuesday, 15 September 2020

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन म्हणजेच CBI आणि सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ED यांनी अशा प्रकारचा ग्रुप असल्याची माहिती दिली आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आता एक नवी आणि धक्कादायक माहिती समोर येतेय. या नव्या माहितीतून सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांनी ड्रग्स बाबत बोलण्यासाठी एक खास WhatsApp ग्रुप बनवला असल्याचं समजतंय. या ग्रुपमध्ये सुशांतच्या घरातील काम करणारी मंडळी होती आणि या ग्रुपच्या माध्यमातून अमली पदार्थांबाबत बोललं जायचं. 'झी न्यूज'च्या एका रिपोर्टनुसार हा WhatsApp ग्रुप सुशांतच्या आधीच्या घरी म्हणजे 'केप्री हाईट्स' या फ्लॅटवर बनवला गेल्याचं समजतंय. या ग्रुपमधून घरात राहणारे आणि काम करणाऱ्यांमध्ये संवाद साधला जात असे. सुशांत त्याच्या नवीन घरी शिफ्ट होण्याआधी याच घरी राहत होता.   

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन म्हणजेच CBI आणि सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ED यांनी अशा प्रकारचा ग्रुप असल्याची माहिती दिली आहे. या माध्यमातून विविध गोष्टींवर संवाद साधला जायचा. मुख्यत्वे ड्रग्स हे घरात काम करणाऱ्यांच्या खोलीत, म्हणजेच स्टाफ रूममध्ये ठेवले जायचे. जेंव्हा सुशांत किंवा रिया यांना ड्रग्सची गरज भासायची तेंव्हा घरात काम करणाऱ्यांना मेसेज केला जायचा. रिया चक्रवर्तीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB कडे दिलेल्या जबाबात या WhatsApp ग्रुप बाबत माहिती दिली आहे. 

मोठी बातमी : मंत्री उदय सामंत यांना आला धमकीचा फोन

या प्रकरणातील ड्रग्स केसमध्ये रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत, झाएद विलात्रा आणि बासित परिहार याना आरोपी म्हणून १४ दिवसांच्या कस्टडीत ठेवण्यात आलंय. रिया सध्या मुंबईतील भायखळा जेलमध्ये आहे. रिया आणि शोविकने दिलेल्या माहितीनंतर तपास यंत्रणांनी अनेक ठिकाणी छापेमारीही केलीये. यामधून अनेक ड्रग पेडलर्सची नावं देखील समोर आलेली आहेत, ज्यांच्याकडून याआधी ड्रग्स घेतले गेलेत.      

चक्रवर्ती यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितलंय की, ते सध्या कोणत्याही प्रकारच्या जामीन अर्जासाठी अर्ज करण्याची घाई करणार नाहीत. NCB ने तक्रार दाखल केल्यानंतर गेल्याच आठवड्यात मुंबईतील विशेष न्यायालयाने रिया, शोविक आणि इतर चौघांचा जमीन अर्ज फेटाळून लावला होता.

sushant and rhea formed whats app group for the discussion with home workers 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant and rhea formed whats app group for the discussion with home workers