esakal | आज CBIचं पथक चौकशीसाठी रियाच्या घरी जाणार?, 'हे' प्रश्न विचारण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

आज CBIचं पथक चौकशीसाठी रियाच्या घरी जाणार?, 'हे' प्रश्न विचारण्याची शक्यता

सीबीआयची टीम आज कोणत्याही क्षणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी जाऊन तिची आणि तिच्या कुटुंबाची चौकशी करण्यासाठी पोहोचू शकते.रिया सध्या तिच्या मुंबईतील घरी आहे.

आज CBIचं पथक चौकशीसाठी रियाच्या घरी जाणार?, 'हे' प्रश्न विचारण्याची शक्यता

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवल्यानंतर आता सीबीआयच्या टीमनं चौकशीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत सीबीआयनंतर कूक नीरज, मित्र सिद्धार्थ पिठानी आणि दीपेश सावंत यांचे पुन्हा जबाब नोंदवून घेतलेत. दरम्यान सीबीआय आज रिया चक्रवर्तीची चौकशी करण्याची शक्यता आहे. 

सीबीआयची टीम आज कोणत्याही क्षणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी जाऊन तिची आणि तिच्या कुटुंबाची चौकशी करण्यासाठी पोहोचू शकते.रिया सध्या तिच्या मुंबईतील घरी आहे. रियाला अद्याप चौकशीला बोलावण्यात आलेलं नाही. त्याआधी सीबीआयने काल रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीची चौकशी केली.

सीबीआयच्या टीमने काल (२२ ऑगस्ट) सुशांत सिंह राजपूतच्या घरी आणि कूपर रुग्णालयात जाऊन चौकशी केली. कूपर रुग्णालयातच सुशांतचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं. सीबीआयने आतापर्यंत सिद्धर्थ पिठाणी, नारज आणि दीपेश सावंत यांची चौकशी केली आहे.

हेही वाचाः  सुशांत सिंह राजपूतच्या शेजाऱ्यांकडून मोठा खुलासा; 'त्या' दिवशी नेमकं काय झाले, वाचा सविस्तर

आतापर्यंत अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्र्र्रिंग प्रकरणात अनेकदा रियाची चौकशी केली आहे. रिया व्यतिरिक्त तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित आणि सुशांतच्या बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांचेही जबाब नोंदवून घेतलेले आहेत. दुसरीकडे शोविक आणि रियाने दिलेल्या उत्तरांनी ईडीचे समाधान झालेले नाही. रियाने आपले उत्पन्न आणि खर्चाचा तपशील योग्यरित्या मांडलेला नसल्याचं समजतंय.

अधिक वाचाः  CBI ची टीम तब्बल ६ तासाहून अधिक काळ होती सुशांतच्या घरी, नेमकं काय घडलं तपासात

दोन दिवसांपूर्वी महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झालं होतं. त्यामुळे नवं वादळ निर्माण झालं. यावरून दोघांनाही टीकेला सामोरे जावे लागले होते. सुशांतचे घर सोडल्यानंतर रियाने भट्ट यांना मेसेज केले होते. याशिवाय रुग्णालयाच्या शवागारात रिया चक्रवर्ती गेली होती. त्यावेळी तिने जे शब्द उच्चारले होते, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे सीबीआयची टीम याबाबत रियाला प्रश्न विचारु शकते.

Sushant Death Case CBI team will go riya chakrawarti home today

loading image
go to top