सुशांत सिंग राजपूत प्रकरण : चार ठिकाणी ED ची शोध मोहिम

सुशांत सिंग राजपूत प्रकरण : चार ठिकाणी ED ची शोध मोहिम

मुंबई,ता.14 अभिनेता सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी तपास करणा-या सक्तवसुली संचलनालयाने (ED) चार ठिकाणी शोधमोहिम राबवली. चित्रपट निर्माता दिनेश वीजन यांच्याशी संबंधीत ठिकाणावर ही शोधमोहिम राबवण्यात आल्याचे  सूत्रांनी दिली.

ईडीने याप्रकरणी दिनेश यांची गेल्या महिन्यात चौकशी केली होती. त्यांनी सुशांत सिंगचा राबता चित्रपट दिग्दर्शीत केला होता. सुशांत सिंग व दिनेश यांच्यातील काही वित्तीय व्यवहारांची माहिती ईडीला पाहिजे असल्यामुळे त्यांनी याप्रकरणी शोध मोहिम राबवली. याबाबत दिग्दर्शक दिनेश विजन यांच्याकडून याप्रकरणी कोणतीही माहिती मिळू शकली नाही. दिनेश यांनी लव आज कल, कॉकटेल, बदलापूर, गो गोवा गॉन व बिंग सायरस सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. दिनेश यांचा राबता हा चित्रपट 9 जून 2017 मध्ये प्रदर्शिक झाला होता. त्यात सुशांत सिंग राजपुतसह क्रीती सॅनॉन यांनी प्रमुख भूमिका होत्या. दिनेश विजन व राजपूत यांच्यात दोन प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात होते. पण त्याचे व्यवहार झाले की नाही, याबाबत ईडी सध्या तपास करत आहे. याप्रकरणी दिनेश यांच्या मुंबईतील घरासह चार ठिकाणी ईडीने शोध मोहिम राबवल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी सुशांत सिंगची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी रियाने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिटकार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेल्याचे असे म्हटले आहे. तसेच सुशांतच्या खात्यामधील15 कोटी रुपये देखील रियाने काढले असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पुढे मनी लाँडरींग प्रकरणी ईडीनेही गुन्हा दाखल केला होता.

( संपादन - सुमित बागुल )

Sushant singh rajaput death case ED raids four locations in mumbai says sources

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com