मुंबईतील मेट्रो सुरु करण्यास परवानगी, ग्रंथालयं देखील उद्यापासून खुली होणार; शाळांबाबत काय म्हटलंय परिपत्रकात, वाचा

सुमित बागुल
Wednesday, 14 October 2020

मुंबई मेट्रो सेवेबाबतचे सर्व SOP हे नगरविकास विभाग तर ग्रंथालयं सुरु करण्याबाबतचे SOP उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून जारी करण्यात येणार आहेत. 

मुंबई : कोरोनाचे दिवसमागचे आकडे कमी होतायत दिसतायत. मात्र, कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. अशात राज्यात टप्प्या टप्प्याने अनलॉकची प्रक्रिया  सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यसरकारच्या वतीने अनलॉक संदर्भातील नवीन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. राज्यात अनलॉक होत असताताना मुंबईकरांसाठी एक अत्यंत मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये मुंबईतील 'मुंबई मेट्रो सेवा' सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील अनलॉकबाबत जरी करण्यात आलेल्या परिपत्रकात याबाबत माहिती आहे. दरम्यान मुंबई मेट्रो सरसकट सुरु होणार नसून मुंबई मेट्रो सेवा ही टप्प्याटप्प्याने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता मुंबईतील मेट्रो सेवा सुरु होणार असल्याने मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. 

महत्त्वाची बातमी : "ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का?" अमृता फडणवीसांना ठाकरी भाषेत तिखट उत्तर

मुंबई मेट्रो सेवेप्रमाणे आणखीन एक महत्त्वाचा निर्णय आज जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात घेण्यात आलाय. यामध्ये उद्यापासून राज्यातील ग्रंथालयं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील ग्रंथालयं सुरु करण्याची मागणी  होत होती. स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबतची मागणी केली राज्य सरकार कडे केलेली होती. त्यानंतर आता राज्यातील सरकारी आणि खासगी लायब्ररी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

मुंबई मेट्रो सेवेबाबतचे सर्व SOP हे नगरविकास विभाग तर ग्रंथालयं सुरु करण्याबाबतचे SOP उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून जारी करण्यात येणार आहेत. 

महत्त्वाची बातमी : बीएमसी आयुक्त आणि महापौरांमध्ये खडाजंगी; आयुक्तांच्या माफीनंतर वादावर पडदा

दरम्यान, राज्यातील मंदिरांचा मुद्दा सध्या प्रचंड प्रमाणात गाजतोय. आज जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात मंदिरांबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. शाळा आणि महाविद्यालये देखील ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. सोबतच आजच्या परिपत्रकातील महत्त्वाची बाब म्हणजे कंटेनमेंट झोनबाहेरील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास आता परवानगी देण्यात आली आहे.

सरकारकडून अनलॉक जरी करण्यात येत असलं तरीही सोशल डिस्टंसिंगचं पालन करतंच नागरिकांना सर्व सेवा आणि सुविधांचा लाभ घेता येणार आहे.  
 

mumbai metro service to resume soon libraries to start from thursday unlock guidelines by maharashtra government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai metro service to resume soon libraries to start from thursday unlock guidelines by maharashtra government