esakal | सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा, मानेवर 'ती' खूण कोणती?
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा, मानेवर 'ती' खूण कोणती?

या प्रकरणात  पोस्टमॉर्टेम केलेल्या डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. शनिवारी सुशांतचा ७ पानांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे.

सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा, मानेवर 'ती' खूण कोणती?

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे (CBI) देण्यात आला. त्यानंतर सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. या प्रकरणात  पोस्टमॉर्टेम केलेल्या डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. शनिवारी सुशांतचा ७ पानांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. सीबीआयला सुशांतचा पोस्टमॉर्टेम अहवाल शुक्रवारी दुपारीच मिळाला.

पाच डॉक्टरांच्या टीमनं हा रिपोर्ट तयार केला आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या गळ्यावर ३३ सेमी लांब एक खूण होती. त्याची जीभ बाहेर नव्हती आली. दात ठीक होते, शरीरावर कोणतीही जखम किंवा खूण नव्हती. रिपोर्टनुसार, सुशांतच्या पापण्या अर्धवट उघडल्या होत्या. शरीरातील कोणतीही हाडं तुटली किंवा मोडलेली नव्हती.

दरम्यान सीबीआयनं केलेल्या चौकशीत सुशांतची अटॉप्‍सी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी त्यांना लवकरच पोस्टमार्टम करण्यास सांगितले होतं. तसंच शनिवारी सीबीआयची एक टीम कूपर रुग्णालयात पोहोचली, जिथे सुशांतची अ‍ॅटॉप्‍सी करणाऱ्या डॉक्टरांची विचारपूस करण्यात आली. शनिवारी एक टीम कूपर रुग्णालयात पोहोचली होती. रुग्णालयात जाऊन अधिकाऱ्यांनी ५ डॉक्टरांची चौकशी केली. अॅटॉप्‍सी अहवालात अनेक प्रकारचे त्रुटी समोर आल्या असल्याची माहिती मिळत आहे. 

हेही वाचाः  आज CBIचं पथक चौकशीसाठी रियाच्या घरी जाणार?,'या' मुद्द्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता
 

रियाची आज चौकशी होण्याची शक्यता

सीबीआय आज रिया चक्रवर्तीची चौकशी करण्याची शक्यता आहे. सीबीआयची टीम आज कोणत्याही क्षणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी जाऊन तिची आणि तिच्या कुटुंबाची चौकशी करण्यासाठी पोहोचू शकते.रिया सध्या तिच्या मुंबईतील घरी आहे. रियाला अद्याप चौकशीला बोलावण्यात आलेलं नाही. त्याआधी सीबीआयने काल रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीची चौकशी केली.

अधिक वाचाः  सुशांतच्या मृत्यूच्या आधी एक आठवडा काय घडलं? कामगारानं सांगितला घटनाक्रम

सीबीआयच्या टीमने काल (२२ ऑगस्ट) सुशांत सिंह राजपूतच्या घरी आणि कूपर रुग्णालयात जाऊन चौकशी केली. कूपर रुग्णालयातच सुशांतचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं. सीबीआयने आतापर्यंत सिद्धर्थ पिठाणी, नारज आणि दीपेश सावंत यांची चौकशी केली आहे.

Sushant Singh Rajput autopsy report ligature mark is 33 cm

loading image