'त्या' युरोप ट्रिपनंतर कसं बदललं सुशांतचं आयुष्य, रियानं केला खुलासा

पूजा विचारे
Thursday, 27 August 2020

रियानं पहिल्यांदा सुशांतबद्दल काहीतरी वक्तव्य केलं आहे. ज्यात तिनं स्वतःवर लागलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देत सुशांतच्या आयुष्याबद्दल सांगितलं आहे. 

मुंबईः सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर बरेच आरोप करण्यात येत आहेत. सुशांतच्या कुटुंबियांनीही रिया आणि तिच्या कुटुंबियासह ६ लोकांवर गंभीर आरोप लावले आहेत. सीबीआयची टीम सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या आरोपानंतर सर्वांच्या नजरा रियाकडे आहेत. या प्रकरणी रिया ही संशयित आरोपी असल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान रियानं पहिल्यांदा सुशांतबद्दल काहीतरी वक्तव्य केलं आहे. ज्यात तिनं स्वतःवर लागलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देत सुशांतच्या आयुष्याबद्दल सांगितलं आहे. 

रिया चक्रवर्तीनं या प्रकरणाबद्दल पहिल्यांदा एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी रियानं सुशांत कशापद्धतीनं आयुष्य जगत होता त्याबद्दल सांगितलं आहे. 

सुशांतच्या कुटुंबियांनी रियानं पैशांची अफरातफर करुन त्याची फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे. या आरोपांचं रियानं खंडन केलं आहे. रियानं म्हटलं की, सुशांत पहिल्यापासूनच किंग साईजचं आयुष्य जगत होता. माझ्यासोबत रिलेशनशिप होण्यापूर्वी तो आधी थायलंडच्या ट्रिपला गेला होता. जिथे त्यानं ६ मुलांवर ७० लाख रुपये खर्च केले होते.

हेही वाचाः  विनायक मेटेंच्या नसत्या उठाठेवींनी मराठा आरक्षणावर बालंट, काँग्रेसचा गंभीर आरोप

युरौप ट्रिपचा संदर्भ देत ती म्हणाली की, जेव्हा आम्ही युरोप ट्रिपला जात होतो. तेव्हा सुशांतनं सांगितलं की, मला विमानात बसायची भीती वाटते. त्यासाठी मी एक औषध घेतो. ज्याचं नाव मोडाफिनिल आहे. फ्लाईटमध्ये बसण्याआधी त्यानं ते औषध घेतलं. कारण ते औषध नेहमी सुशांतजवळ असायचं. 

या मुलाखतीत रियानं आपल्या भावाला युरोप ट्रिपला का घेऊन गेली? युरोप ट्रिपमध्ये नेमकं काय झालं? असे प्रश्न विचारण्यात आले. ज्याचं तिनं उत्तर दिलं. तिनं सांगितलं की, आम्ही पॅरिसमध्ये उतरलो. तीन दिवस सुशांत खोलीतून बाहेर निघाला नाही. हे बघून मी थोडी घाबरली. कारण मी खूप उत्साहित होती. मला असं वाटतं होतं की त्याची फनसाईड बघू शकेन. कारण तो येथे आरामात रस्त्यावर मजा करु शकतो जे भारतात करु शकत नव्हतो.

अधिक वाचाः  महाड दुर्घटनेतल्या चिमुरड्यांचं पालकत्व शिवसेनेच्या 'या' मंत्र्यानं स्वीकारलं, बँक खात्यात असेल इतकी रक्कम

मात्र स्विझर्लंडला पोहोचल्यावर तो खुश होता. मात्र जेव्हा इटलीत पोहोचलो. तिथे आमच्या खोलीचं विचित्र असं स्ट्रक्चर होतं. रियानं सांगितलं मला त्या खोलीत भीती वाटली. मात्र सुशांत मला बोलला सगळं ठिक आहे. रिया बोलली तेव्हा सुशांतनं मला सांगितलं होतं की, येथे काही तरी आहे. मात्र मी म्हटलं की ते एक वाईट स्वप्न असण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुशांतची तब्येत बिघडली आणि तो खोलीच्या बाहेर येण्यास तयारच नव्हता.

हेही वाचाः  नाहीतर लोक प्रॉपर्टी चोरुन नेतील, शिवसेनेचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा

रियानं पुढे सांगितलं की, २०१३ मध्येही त्याच्यासोबत असं झालं होतं. जेव्हा त्याच्यासोबत डिप्रेशन सारख्या गोष्टी घडण्यास सुरुवात झाली होती. मग तो एका मानसशास्त्रज्ञाला भेटला, ज्याच नाव हरेश शेट्टी आहे. त्यांनीच त्याला औषधांबद्दल सांगितलं होतं. 

यावेळी रियानं शौविक आणि सुशांतमध्ये असलेल्या नात्याबद्दल सांगितलं. तसंच रियेलिटिक्स नावाची कंपनीबद्दल ती बोलली. रियानं सांगितलं की, सुशांतचा हा ड्रिम प्रोजेक्ट होता. यात मी, माझा भाऊ आणि सुशांत तीन पार्टनर होते. यासाठी तिघांनाही ३३-३३ टक्के द्यायचे होते. मी माझ्या भावाचे पैसे माझ्या बँक खात्यातून दिले होते.

sushant singh rajput case girlfriend rhea chakraborty revealed europe trip incident


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput case girlfriend rhea chakraborty revealed europe trip incident