सुशांतसिंह राजपूत मृ्त्यू प्रकरण! CBI चे पथक तपासासाठी मुंबईत दाखल

तुषार सोनवणे
Thursday, 20 August 2020

सुशांतसिंह राजपुत मृत्यू प्रकरणी सीबीआयचे पथक दिल्लीवरून मुंबईत दाखल झाले आहे. सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी ते मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे.

मुंबई - सुशांतसिंह राजपुत मृत्यू प्रकरणी सीबीआयचे पथक दिल्लीवरून मुंबईत दाखल झाले आहे. सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी ते मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सर्वत्र चर्चेला उधान आल्याने, मुंबई पोलिस आणि बिहार पोलिमसांमध्ये कलगीतूरा रंगल्याचे दिसत होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआय़ चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार आज सीबीआयचे पथक मुंबईत तपासासाठी दाखल झाले आहे. दहा सदस्यांची ही टीम आहे. या विशेष तपासाच्या पथकाचे नेतृत्व मनोज शशिधर करणार आहेत. त्यांच्यासोबतच गगनदीप गंभीर, मुकूल प्रसाद, अनिल यादव हे बडे पोलिस अधिकारी असणार आहे.

 या तपासात पाच टीम असू शकतील. प्रत्येक टीम मध्ये दोन व्यक्ती असे तापसाचे नियोजन असू शकते. या पाचही टीममध्ये मुंबई सीबीआयचे अधिकारी मदतीसाठी सहभागी असणार आहेत. याचील एक टीम मुंबई पोलिसांशी समन्वय साधणार आहेत. 

कोरोनाबाबतची हलगर्जी तरुणांना भोवतेय! 'या' तीन वयोगटातील रुग्णांची संख्या लाखावर

सर्वाेच्च न्यायालयाने बिहार आणि महाऱाष्ट्र पोलिस दलांवर होणाऱ्या आरोपांवर पुर्ण विराम मिळावा, आणि या प्रकरणाची निपक्ष तपास व्हावा म्हणून न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. आता मुंबई महानगर पालिका सीबीआयच्या पथकाला क्वारंटाईन करणार का ? कोणाकोणाची चौकशी होणार? मुंबई पोलिस करत असलेला तपास चालुच ठेवणार का? सीबीआय या प्रकरणी कसा तपास करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput death case! CBI team arrives in Mumbai for investigation