सुशांत सिंह राजपूत प्रकरणः CBIनं रिया चक्रवर्तीच्या आई- वडिलांना विचारले 'हे' १२ प्रश्न

पूजा विचारे
Tuesday, 1 September 2020

सीबीआयच्या टीमनं आज रिया चक्रवर्तीच्या ऐवजी तिच्या आई वडिलांना चौकशीसाठी बोलावलं. सीबीआयच्या टीमनं रियाच्या आई वडिलांना सुशांत आत्महत्या प्रकरणाशीसंबंधित काही प्रश्न विचारले आहेत.

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहेत. सीबीआयच्या टीमनं आज रिया चक्रवर्तीच्या ऐवजी तिच्या आई वडिलांना चौकशीसाठी बोलावलं आहे. सीबीआय या प्रकरणी आता मनीट्रेलचा तपास करत आहे. याच कारणानं आज रियाचे वडिल इंद्रजित चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती यांच्यासोबतच कुक नीरज, नोकर केशव, फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी आणि पूर्व मॅनेजर श्रृती मोदी यांनाही बोलावलं आहे. सीबीआयच्या टीमनं रियाच्या आई वडिलांना सुशांत आत्महत्या प्रकरणाशीसंबंधित काही प्रश्न विचारले आहेत. 

अधिक वाचाः  जे. जे. रुग्णालयात काळ्या फिती लावून परिचारिकांचं आंदोलन

असं सांगितलं जात आहे की, सीबीआयची टीम सुशांत राजपूतच्या मृत्यू प्रकरणात बऱ्याच अँगलनं चौकशी करत आहेत. या प्रकरणाचा तपास करताना आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. यावेळी ड्रग्स कनेक्शनचं नवं प्रकरण समोर आलं आहे. त्यातच सुशांतच्या वडिलांनी आरोप केला आहे की, सुशांतच्या बँक अकाऊंटमधून १५ कोटी रुपये गायब झाले आहेत. अशातच आता सीबीआयच्या टीमनं रियाची चार दिवसात ३५ तासांहून अधिक वेळ चौकशी केली. या प्रकरणात आता रियाचे आई वडिलांची सीबीआय चौकशी करत आहेत. 

हेही वाचाः  मनसेच्या आरोपानंतर भाजपकडून मुंबईच्या महापौरांवर गंभीर आरोप

जाणून घेऊया सीबीआयनं रियाच्या आई वडिलांना कोणकोणते प्रश्न विचारले

 • तुम्हाला कधी समजले की सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती रिलेशनशिपमध्ये आहेत. 
 • शौविकनं तुम्हाला सुशांत सिंह राजपूत आणि रिया यांच्यात वारंवार होणाऱ्या भांडणाबद्दल काही सांगितलं का? कारण शौविक वारंवार सुशांतच्या घरी ये-जा करत असायचा?
 • रियानं तुम्हाला कधी सांगितलं का की, तिला सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये राहायचं नाही आहे? 
 • तुम्ही सुशांतला त्याच्या घरी किंवा कुठे बाहेर किती वेळा भेटला आहात?
 • रिया सुशांतसोबत त्याच्या घरी राहत होती याची तुम्हाला कल्पना होती का? 
 • सुशांत सिंह राजपूतसोबत तुमचं कधी कधी बोलणं व्हायचं? दिवसातून, आठवड्यातून कि महिन्यातून किती वेळा तुम्ही सुशांतच्या संपर्कात होतात?
 • सुशांतची मेंटल हेल्थ थोडी खराब आहे असं तुम्हाला कधी वाटलं का? किंवा रियानं कधी तुम्हाला याबाबत सांगितलं का? 
 • सुशांत आणि तुमच्यात कधी पैशांवरुन कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाला का? 
 • तुम्ही रियासोबत कधी सुशांतच्या पैशांवरुन विचारलं होतं का?
 • सुशांत सिंह राजपूतचे पैसे शौविक खर्च करतो याबाबत तुम्हाला काही माहित होतं का? 
 • तुम्ही कधीही शौविक किंवा रियाला सुशांतच्या पैसे खर्च करण्यावरुन कधी थांबवलं नाही का?
 • रिया चक्रवर्तीचा ड्रग्स माफियांसोबत काही कनेक्शन आहे याबाबत तुम्हाला काही माहिती होती?
 • Sushant Singh Rajput Death Case Rhea Chakraborty Parents Cbi Inquiry 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput Death Case Rhea Chakraborty Parents Cbi Inquiry