'हे' होतं बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचं शेवटचं ट्विट...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

Blurred past evaporating from teardrops
Unending dreams carving an arc of smile
And a fleeting life,
negotiating between the two...
#माँ ❤️

मुंबई - २०२० आपल्याला अजून काय काय दाखवणार असाच आता प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय. याला कारण ठरतंय ते अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आपल्या मुंबईतील वांद्र्याच्या राहत्या घरी गळफास लावून केलेली आत्महत्या.

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडसह जगभरातील त्याचा चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. धक्कादायक बाब म्हणजे सुशांतने आपले काही मित्र घरी असताना स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं होतं. बराच वेळ सुशांत खोलीचा दरवाजा का उघडत नाही म्हणून त्याच्या मित्रांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला.

भीषण : ब्रेकिंग: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या

यानंतर सुशांत ने आत्महत्या केल्याचं त्यांना आढळलं. या प्रकरणी घरात तपास करत असताना सुशांत सिंग राजपूत डिप्रेशनमध्ये होता आणि त्या संबंधित काही ट्रीटमेंट घेत असल्याचे कागदपत्रं आढल्याचं टीव्ही रिपोर्टमधून समोर आलंय.

दरम्यान आता सुशांतच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टबद्दल सोशल मीडियात चर्चा होतेय.  

हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सुशांतने ३ जून रोजी शेअर केल्याचं समजतंय. त्यात सुशांत ने लिहिलेल्या कॅप्शनचा अनुवाद :  

अश्रूंच्या तुलनेत अंधुक झालेला भूतकाळ... 
अंतहीन स्वप्ने आणि त्यातून उमटणारं स्मितहास्य 
आणि क्षणभंगूर जीवन,
दोघांमधील वाटाघाटी ... #माँ

Sushant Singh Rajput spoke of fleeting life in last Instagram post

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput spoke of fleeting life in last Instagram post