सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणः सलग तिस-या दिवशी रियाची चौकशी

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणः सलग तिस-या दिवशी रियाची चौकशी

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) रविवारी पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीची चौकशी केली. याप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकही पुढील आठवड्यात रियाची चौकशी करण्याची शक्यता आहे.  सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआयने रियाला सगल तिस-या दिवशी चौकशीसाठी बोलावले होते. पहिल्या दिवशी, शुक्रवारी सीबीआयकडून रियाला प्रथमचौकशीसाठी बोलवण्यात आले होते. शुक्रवारी  सुमारे 10 तास सीबीआयने रियाची चौकशी केली. तर शनिवारी 29 ऑगस्ट रोजी रियाची 7 तास चौकशी केली गेली. मात्र चौकशीसाठी रिया डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वी सुशांत सिंग प्रकरणी संबंधीत सर्व जण उपस्थित होते. यांमध्ये सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंग यांची सीबीआयने चौकशी केली आहे. रविवारी रियासोबत तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीही सांताक्रुझ येथील डीआरडीओ कार्यालयात पोहोचला होता.

 दरम्यान, सुशांत सिंह राजपूततच्या बँक खात्यांच्या ऑडिटमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सुशांतच्या बँक अकाऊंटमधून 70 कोटींची उलढाल झाली आहे. म्हणजेच सुशांतच्या अकाऊंटमध्ये 70 कोटी रुपये आले आणि खर्च झाले आहेत. या ऑडिट रिपोर्टमुळे एक गोष्ट स्पष्ट होती की, सुशांत आपले आयुष्य अगदी मनसोक्त आणि हवे तसे जगत होता. स्वतःवर, मित्रांवर, कुटुंब आणि घरातल्या नोकरावरसुद्धा सुशांत अगदी सहज आणि हवे तसे पैसे खर्च करत होता. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत बँक खात्याचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट केला होता. त्याचप्रमाणे, कंपनीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये समोर आले की, सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक व्यवहार झालेले नाही. तर दुसरीकडे रियाने सीबीआयला सहकार्य करत नसल्यामुळे पुढील आठवड्यातही तिला चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले.

गौरव आर्या चौकशीला हजर राहणार
सुशांत सिंग प्रकरणी ड्रग्सची बाब पुढे आल्यानंतर प्रकरणी सक्त वसुली संचलनालय(ईडी) व केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक(एनसीबी) यांनी तपास करण्यात सुरूवात केली आहे. ईडीने याप्रकरणी संशयीत हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या याला चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यानुसार त्याला 31 ऑगस्टपूर्वी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. रविवारी गौरव आर्या गोव्यातून निघाला असून तो लवकरच ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com