सुशांतसिंग मृत्यू प्रकरण! चित्रपटसृष्टीतील एक पार्टी एनसीबीच्या रडावर; छाप्यात 5 जणाना अटक

सुशांतसिंग मृत्यू प्रकरण! चित्रपटसृष्टीतील एक पार्टी एनसीबीच्या रडावर; छाप्यात 5 जणाना अटक


मुंबई अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी पकरणी एनसीबीने बॉलिवुडमधील ड्रग्ज माफीयांवर कारवाई सुरूच ठेवली असून सध्या चित्रपटसृष्टीशी संबंधीत एक पार्टी  केंद्रीय अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या रडावर आली आहे. गेल्या वर्षी जुलै मध्ये झालेल्या या पार्टीत अनेक बॉलीवूड सेलेब्रीटी सहभागी झाले होते.  या पार्टीशी संबंधीत सर्वाना लवकरच समन्स पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी झालेल्या पार्टीत 11 सेलेब्रीटी सहभागी झाले होते. या सर्वाना समन्स बजाविण्यात येणार असल्यचे एनसीबी सुत्रांनी सांगितले. तर दुसरीकडे रिया आणि शौविकच्या चौकशीतुन तसेच वॉट्सअॅप चॅटमधुन मोठ्या प्रमाणांत ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश झाला आहे. त्यानुसार, एनसीबीने छापेमारी करीत अनेकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. तसेच एनसीबीने पवई, अंधेरी अणि ठाणे परिसरात छापेमार करीत  अंकुश अरनेजा, राहिल रफत विश्रा उर्फ सॅम यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडुन एक हजार 418 किलो गांजा जप्त केला आहे. तसेच चार लाख, 36 हजार रुपये जप्त केल्याचे एनसीबीने सांगितले.

 एनसीबीने ताब्यात घेतलेल्या तस्करांच्या चौकशीतुन अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला आहे. यामुळे एनसीबीने मुंबई, ठाणे परिसरात जोरदार छापेमारी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच पालघर येथे देखील मोठ्या प्रमाणांत ड्रग्जची तस्करी तसेच साठा असल्याची माहिती एनसीबीला मिळाली असुन, त्या अनुंशगाने एनसीबीने तपास करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे, बॉलिवुडमध्ये तस्करी होणा-या ड्रग्ज माफीयांपर्यंत एनसीबीने पोहचण्यास सुरुवात केली असुन, आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी ड्रग्ज घेणा-या तसेच याच्या जाळयात अडकलेल्या बॉलिवुडमधील सेलिब्रेटीजवर एनसीबीने करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

सुंशातची लोणावळ्यातील फार्म हाऊसवर पार्ट्या या प्रकरणात सुशांतच्या फार्म हाऊसचा मॅनेजर पवनने याप्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. या फार्म हाऊसवर अनेक संशयीत पार्ट्या झाल्या असून त्यात काही सेलेब्रेटी मित्रही सहभागी झाले होते. त्याप्रकरणी आता एनसीबी संशयीतांना समन्स पाठवण्याची शक्तता आहे. दरम्यान सुशांतच्या फार्महाऊस मॅनेजर पवनचीही सीबीआयने चौकशी केली आहे

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com