तातडीची औषधे रुग्णालयात ठेवण्यासाठी याचिका; सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

सुनिता महामुणकर
Friday, 18 September 2020

कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेली तातडीची आणि महत्त्वाची औषधे आणि इंजेक्शने रुग्णालयातच विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्याच्या मागणीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांचा विळखा वाढत आहे.

मुंबई : कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेली तातडीची आणि महत्त्वाची औषधे आणि इंजेक्शने रुग्णालयातच विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्याच्या मागणीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांचा विळखा वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यक ठरणारी रेमिडिसीवीर आणि ऐक्टेमेरा या इंजेक्शन्सना मोठी मागणी निर्माण होत आहे. मात्र सध्या केवळ औषधांच्या दुकानातच विक्रीसाठी उ आहेत. याबाबत ऑल महाराष्ट्र ह्युमन राईटस वेल्फेअर असोसिएशनने न्यायालयात अॅड. प्रशांत पांडे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.

कल्याण, डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक; दररोज सरासरी 500 रुग्ण; डोंबिवली पूर्वेला ताप वाढला

याचिकेवर आज न्या. के. के. तातेड यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना ही तातडीची औषधे आणण्यासाठी धावपळ करावी लागते आणि खूप जास्त किमतीने औषधे खरेदी करावी लागतात, अनेक औषधांच्या दुकानात जास्त किमतीला ही इंजेक्शन विक्रीला असतात, असे याचिकादाराने निदर्शनास आणले आहे.

थेट रुग्णालयातच ही औषधे विक्रीसाठी उपलब्ध केली तर जलद गतीने आणि माफक किमतीत औषधे उपलब्ध होतील असा दावा याचिकेत केला आहे. रुग्णालये आणि कोव्हिड विलगीकरण केंद्रांध्ये ही औषधे तातडीने उपलब्ध करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.

भिवंडीत गॅस सिलिंडर गळतीमुळे भडका; प्रसंगवधानामुळे जीवित हानी टळली

राज्य सरकारने याचिकेत उपस्थित मुद्यांवर सविस्तर भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. राज्य सरकारच्या वतीने अॅड. पूर्णिमा कंथारिया यांनी उत्तर दाखल करण्यासाठी अवधी मागितला. याचिकेवर पुढील सुनावणी  2 ऑक्टोबरला होणार आहे.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petition for hospitalization of emergency medicines