सुशांतसिंग मृत्यूप्रकरण! बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी अलिशान कारमधून ड्रग्जची तस्करी

सुशांतसिंग मृत्यूप्रकरण! बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी अलिशान कारमधून ड्रग्जची तस्करी

मुंबई - बॉलीवूड सेलेब्रीटींना ड्रग्स पुरवताना संशय येऊ नये यासाठी आलीशान मर्सीडीज कारचा वापर तस्कर करत असल्याची बाब केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी शनिवारी दोन मुख्य वितरकांसह सहा जणांना अटक केली असून तस्करीसाठी वापरण्यात येणारी मर्सिडीज जप्त करण्यात आली आहे.  

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी पेजथ्री, बॉलीवूड सेलेब्रीटींना ड्रग्स पुरवणा-या रॅकेटचा माग घेणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधीत पथकाने(एनसीबी) मुंबई, गोवा येथे शोध मोहिम राबवली. याप्रकरणी करमजीत सिंग, ड्वेन फर्नाडीस, संकेत पटेल, अंकुश अनरेजा, संदीप गुप्ता व आफताब फतेह अन्सारी या सहा जणांना एनसीबीने अटक केली आहे. त्यातील अंकुश अनरेजा हा हॉटेल व्यावसायिक असून पवईतील एका बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. याशिवाय करमजीत आनंद उर्फ केजे दोघेही मोठे ड्रग्स वितरक आहेत. यातील अनरेजाकडून एनसीबीने मर्सिडीज कार जप्त केली असून त्याचा वापर ड्रग्स तस्करीसाठी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

केजे याने अंधेरीतील क्लबमध्ये सुशांतला वीड(गांजा) पुरवला होता. तसेच रिया चक्रवरीच्या सांताक्रुझ येथील घरी व सुशांतच्या वांद्रे येथील घरीही केजेने ड्रग्स पोहोचवले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.  या सर्व आरोपींना सोमवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. यातील अनरेजाकडून सव्वा लाख तर केजेकडून साडे पाच लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

शोध मोहिमेत करनजीत सिग आनंद(23) याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढी दादर पश्चिम येथून डायवान अँथोनी फर्नांडीस याच्यासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. शिवाजी पार्क येथील रहिवासी असलेला फर्नांडीस हा गांजा वितरक असून त्यांच्याकडून 500 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. सुशांत सिंगचा नोकर दिपेश सावंतला फर्नाडीसने ड्रग्स दिले असल्याचे दिपेशच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक(एनसीबी) पेज थ्री सेलिब्रीटींशी संबंधीत अनुज केशवानी या बड्या वितरकाला अटक केल्यानंतर ड्रग्स पुरवणा-या रॅकेटशी संबंधीत इतरांच्या शोधात आहेत. फैयाज अहमद, कैझान, झैद विलात्रा व अनुज केशवानी यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी धागेदोरे जुळलेले तसेच बॉलीवूड वर्तुळात ड्रग्स पुरवठा करणारे डझनभर वितरक आता अंडरग्राऊंड झाले आहेत. यावेळी मिरांडा व शौविक चक्रवर्तीच्या चौकशीत केजेचे नाव पुढे आले होते. त्यासाठी एनसीबीने रविवारी विशेष शोध मोहिम राबवली.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com