राज्यातील ऑनलाईन परीक्षांवर सायबर हल्ल्याचा संशय; चौकशीसाठी समिती स्थापन

राज्यातील ऑनलाईन परीक्षांवर सायबर हल्ल्याचा संशय; चौकशीसाठी समिती स्थापन

मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. परंतु परीक्षांदरम्यान येत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली.

राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. त्यासंदर्भात सर्व कुलगुरू यांच्यासोबत सामंत यांनी आज चर्चा केली. राज्यातील अनेक विद्यापीठांच्या परीक्षा पार पडल्या आहेत. त्यात अनेक विद्यार्थ्यांनी नाहक त्रास सहन करावा लागला. तसेच अडचणींना सामोरे जावे लागले. याचा आढावा सामंत यांनी घेतला.

ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर आणि कोव्हिडमुळे राहिल्या आहेत. त्यांच्या परीक्षा 10 नोव्हेंबरला घेण्यात येतील अशी माहिती सामंत यांनी दिली. या परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना अडचणीत आणणाऱ्या काही गोष्टी घडल्या आहेत. त्याचा अभ्यास सरकार करीत आहे. ज्या कंपन्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचणी आल्या त्यांना पुन्हा काम न देता ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे. परीक्षा घेत असताना सायबर हल्ला होत होत असल्याचा संशय असून त्याची चौकशी सुरू आहे. असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

काही विद्यापीठांमध्ये परीक्षा घेण्यासाठी ज्या खाजगी कंपनीला काम दिले त्यांनी सहकार्य केलं नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.  या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सत्यशोधक समिती स्थापन केली आहे. या समितीत उच्च शिक्षण विभागातील उच्च पदावरील अधिकारी आहेत. 10 नोव्हेंबर पासून ही समिती आपले काम सुरू करेल. समितीचा अहवाल राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यपाल याना पाठवला जाईल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल. अशी महिती सामंत यांनी यावेळी दिली. 

यासोबतच पुढच्या वर्षीपासून सीईटीच्या परीक्षा तालूका पातळीवर घेण्यात येण्यासंदर्भात नियोजन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------

Suspected cyber attack on online exams in the state Establishment of a committee for inquiry

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com