Sachin Vaze: एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंची अजब मागणी; तळोजा कारागृहात मांजरीचे पिल्लू घेणार दत्तक, कोर्टात दाखल केला अर्ज

मुंबई पोलीस दलातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझेंची अजब मागणी
Sachin Vaze
Sachin VazeEsakal
Updated on

मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहात आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे आरोपी आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात सचिन वाझे आरोपी आहे. या प्रकरणी ते तळोजा कारागृहात आहेत. कारागृहात असताना त्यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टाला अर्ज करत अजब मागणी केली आहे. (Latest Marathi News)

सचिन वाझे तुरुंगात ज्या कोठडीमध्ये आहेत, त्या कोठडीतील मांजराचे पिल्लू आजारी पडले आहे. हे पिल्लू दत्तक घेण्यासाठी सचिन वाझे यांनी न्यायालयात अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टात त्यांनी अर्ज केला आहे. सचिन वाझे यांच्या मागणीनंतर न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

Sachin Vaze
Ritesh Wasnik Dance Video Viral: गौतमीच्या कार्यक्रमात पैसे उधळल्याने अजित पवार गटाचे सभापती अडचणीत? ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

कारागृहातील झुमका नावाच मांजरीच पिल्लू अशक्त असून त्याचा सांभाळ करण्याची गरज असल्याचा दावा वाझे यांनी अर्जात केला आहे.आपण प्राणी मित्र असून या आधी देखील भटक्या कुत्र्यांना आणि मांजरांना वाचवून त्यांचा सांभाळ केल्याची त्यांनी माहिती दिली आहे. न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी वाझे आहे तळोजा कारागृहात आहेत. (Marathi Tajya Batmya)

Sachin Vaze
Crime News: बुलढाण्यात अल्पवयीन मुलाकडून अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; घटनेनं खळबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com