Crime News: बुलढाण्यात अल्पवयीन मुलाकडून अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; घटनेनं खळबळ

बुलढाण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.
crime news
crime news Sakal

बुलढाण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा तालूक्यातील तरवाडी गावात अतिशय संतापजनक घटना घडली आहे. चॉकलेटचे अमिष दाखवत अडीच वर्षाच्या चिमुकलीवर १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

अल्पवयीन मुलाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सुरवातीला बुलढाणा सामान्य रूग्णालयात उपचार करून पुढील उपचारांसाठी तिला अकोला सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

crime news
Indian Student Killed in US : अमेरिकेत PhD करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; अजूनही कारवाई नाही

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा चिमुकलीच्या शेजारी राहतो. या चिमुकलीला हा शेजारी खेळवत असे. काल काही वेळ ती घरी न दिसल्याने घरातील सदस्यांनी तिचा शोध घेतला, त्यावेळी ही चिमुकली आरोपीसोबत गेल्याची माहिती मिळाली, तेव्हा शोध घेतला असता तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचं दिसून आलं. तात्काळ तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. तर काल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

तर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रात्री अकोला रूग्णालयात पिडीत मुलीची भेट घेतली आहे.

crime news
Pune Crime News: पुण्यात वाईन शॉपवर फिल्मी स्टाईल दरोडा, पाच जणांना अटक; आरोपींमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com