प्रभाग अधिकाऱ्यांना निलंबित करा;  सभागृह नेत्यांची मिरा-भाईंदर पालिका आयुक्तांकडे मागणी

प्रभाग अधिकाऱ्यांना निलंबित करा;  सभागृह नेत्यांची मिरा-भाईंदर पालिका आयुक्तांकडे मागणी

भाईंदर - मिरा-भाईंदर रोडवरील जालजा लॉजिंग बोर्डींगच्या अवैध बांधकामाला न्यायालयीन स्थगितीचे आदेश मिळण्यासाठी महत्वपुर्ण भूमिका बजाविणारे प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा आयुक्त दालनाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय राठोड यांना दिला आहे. 

मिरा-भाईंदर रोड, एस.के. स्टोन समोर रॉयल चॅलेंज या निवासी इमारतीत अंतर्गत फेरबदल करून या ठिकाणी जालजा नावाच्या लॉजिंग बोर्डींगचे काम बेकायदेशीररित्या सुरू आहे. या कामासंदर्भात माजी आयुक्त बालाजी खतगांवकर आणि चंद्रकांत डांगे यांनी ठोस भुमिका घेत काम रोखले होते. परंतु, आता या लॉजिंग बोर्डींगचे काम पुन्हा जोरात सुरू आहे. 

या इमारतीमध्ये अंतर्गत फेररचना करण्यासंदर्भात नगररचना विभागाकडे जालजा हॉटेल मालकाने परवानगी मागितली असता हा प्रस्ताव नगररचना विभागाने मागील तीन वर्षापुर्वीच फेटाळून लावलेला आहे. मात्र, न्यायालयात अंतर्गत फेररचनेच्या मुद्दयावरून स्थगन आदेश प्राप्त करणाऱ्या या हॉटेल मालकाच्या भुमिकेला विधी विभागाने कोणत्याही प्रकारचा विरोध न्यायालयात दर्शविला नसल्याने विधी विभाग वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. दरम्यान, स्थगन आदेश मिळणेकामी संशयास्पद भुमिका वटविणाऱ्या प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांना मनपा सेवेतून निलंबित करण्यात यावे, अन्यथा आयुक्त दालनासमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रशांत दळवी यांनी दिला आहे. याबाबत स्वप्नील सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता.  

 Suspend ward officers Demand of House Leaders to Mira-Bhayander Municipal Commissioner

--------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com