esakal | चकमक फेम सचिन वाझे पुन्हा ऑन ड्युटी; एकूण 18 पोलिसांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय..
sakal

बोलून बातमी शोधा

sachin waze

घाटकोपर स्फोटांमधील संशयीत आरोपी ख्वाजा युनुस मृत्यू प्रकरणी निलंबीत सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत सामील करून घेण्यात आले आहे. वाझे यांच्यासह 18 पोलिस अधिकारी व कर्मचाऱयांना पुन्हा सेवेत सामील करण्यात आले आहे. त्यात ख्वाया युनुस प्रकरणात निलंबीत झालेल्या  चार पोलिसांचा समावेश आहे.

चकमक फेम सचिन वाझे पुन्हा ऑन ड्युटी; एकूण 18 पोलिसांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: घाटकोपर स्फोटांमधील संशयीत आरोपी ख्वाजा युनुस मृत्यू प्रकरणी निलंबीत सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत सामील करून घेण्यात आले आहे. वाझे यांच्यासह 18 पोलिस अधिकारी व कर्मचाऱयांना पुन्हा सेवेत सामील करण्यात आले आहे. त्यात ख्वाया युनुस प्रकरणात निलंबीत झालेल्या  चार पोलिसांचा समावेश आहे.

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आयोजीत करण्यात आलेल्या पुनर्विलोकन बैठकीत 113 निलंबीत पोलिसांच्या निलंबनावर चर्चा झाली. त्यातील 95 पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आलेले नाही. त्यातील तीन पोलिसांचे निलंबन पोलिस संचालक कार्यालयामार्फत करण्यात आले होते.

हेही वाचा: सावधान ! घरच्याघरी कोरोना टेस्ट करून घेण्याच्या विचारात आहात, एक मिनिट आधी ही बातमी वाचा आणि सजग व्हा...

निलंबीत अधिकारी व कर्मचाऱयांच्या निलंबनाबाबत शुक्रवारी पुनर्विलोकन बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यात या सर्व अधिका्री व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या प्रकरणाची पुन्हा पडताळणी करण्यात आली व ज्यांना शक्य आहे. अशांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

दरम्यान, निलंबन मागे घेण्यात आलेल्या सर्व अधिकार व कर्मचाऱयांना कमी महत्त्वाच्या विभागात बदली करण्यात आली आहे. चकमक फेम वाझे यांनाही सशस्त्र पोलिस दल येथे नियुक्ती करण्यात आली आहे. 1990 मध्ये सेवेत दाखल झालेल्या वाझे यांनी 63 गुंडांना यमसदनी धाडले होते.

गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त परिसरातून सेवेची सुरूवात करणाऱ्या वाझे  ठाणे पोलिस दलात आपल्या कामामुळे प्रसिद्धीला आले. 2002 घाटकोपर स्फोटीतील संशयीत आरोपी ख्वाजा युनुस कोठडीतील संशयीत मृत्यूप्रकरणात त्यांना निलंबीत करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षातही प्रवेश केला होता. 

ख्वाजा युनुस प्रकरणी वाझे यांच्यासह 14 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पण याप्रकरणी ठोस पुरावे मिळाले नाहीत. त्यांच्यासह ख्वाजा युनुस प्रकरणातील आणखी तीन पोलिसांनाही सेवेत पुन्हा घेण्यात आलेल आहेत.या बैठकीत एकूण 18 निलंबीत पोलिसांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे.

हेही वाचा: आपल्या मुलाशी व्हि़डीओ कॉलवर बोलण्यासाठी चक्क घ्यावी लागली न्यायालयाची मदत! वाचा बातमी सविस्तर

मुंबई पोलिस दलात आधीच संख्याबळ कमी आहे. त्यात निलंबीत पोलिस घर बसल्या 75 टक्के पगार घेतात. त्यामुळे त्यांना सेवेत घेऊन कमी महत्त्वाच्या खात्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे संख्याबळाचा प्रश्नही सुटेल व त्यांच्याविरोधात सुरू असणाऱया चौकशीवरही परिणाम होणार नाही, असा पर्याय निवडण्यात आल्याचे वरिष्ठ  अधिकाऱ्याने सांगितले.

suspended police officer sachin waze back on duty 

loading image