उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठीही स्वाध्याय उपक्रम राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

तेजस वाघमारे
Saturday, 2 January 2021

राज्यातील उर्दू माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्‌सऍपच्या आधारे स्वत:चे मूल्यमापन करण्याची सुविधा शालेय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

मुंबई : राज्यातील उर्दू माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्‌सऍपच्या आधारे स्वत:चे मूल्यमापन करण्याची सुविधा शालेय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.1) या स्वाध्याय उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. उर्दू माध्यमासाठी असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षण विभागाने सुरू केलेल्या स्वाध्याय उपक्रम या योजनेचा लाभ राज्यातील 13 लाख उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या उपक्रमाचे थेट प्रक्षेपण शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांच्यासाठी https://youtu.be/UNpEvZl7RIw या लिंकद्वारे करण्यात आले. यावेळी या योजनेचा लाभ कसा घ्यावा, याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. योजनेसाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वर्षा गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात भाग घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच, राज्यात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आदर्श शाळा योजना राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
स्वाध्याय उपक्रमामध्ये दर शनिवारी भाषा व गणितातील त्या त्या वर्गाच्या अध्ययनानुसार 10 प्रश्‍नांचा संच विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. विद्यार्थी त्यांच्या सोईनुसार प्रश्‍नसंच पूर्ण करतील व त्यानंतर उत्तरपत्रिकेवरून स्वतःचे मूल्यमापन विद्यार्थ्यांना करता येणार आहे

Swadhyay activities for Urdu medium students also in maharashtra

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swadhyay activities for Urdu medium students also in maharashtra