घरपोच मद्यविक्रीसाठी झोमॅटो, स्विगीचा पुढाकार! वाचा कोणत्या शहरात होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 21 मे 2020

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांनी घरपोच मद्यविक्रीसाठी परवानगी दिली. या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी या दोन्ही कंपन्या सज्ज झाल्या असून लवकरच देशभरात घरपोच मद्यसेवा सुरु करणार असल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.

मुंबई : घरपोच मद्यविक्री करण्यासाठी स्विगी आणि झोमॅटो या कंपनीने पुढाकार घेतला आहे. झारखंडची राजधानी रांची शहरातून या दोन्ही कंपन्यांनी घरपोच मद्यविक्री करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांनी घरपोच मद्यविक्रीसाठी परवानगी दिली. या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी या दोन्ही कंपन्या सज्ज झाल्या असून लवकरच देशभरात घरपोच मद्यसेवा सुरु करणार असल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.

कोरोनाला रोखण्यासाठी 50-30 चा फॉर्म्युला? वैज्ञानिकांनी सुचवला हा पर्याय

घरपोच मद्य खरेदी करताना स्विगीने काही नियम घालून दिले आहे. वयाचे नियम पाळण्यासाठी स्विगीने अॅपवर ओळखपत्र अपलोड करणे ग्राहकांना बंधनकारक केले आहे. शिवाय होम डिलिव्हरीवेळी ग्राहकांना आपला ओटीपी नंबरही द्यावा लागणार आहे. त्यामुळे एक व्यक्ती अतिरिक्त मद्यसाठा करु शकणार नाही.

सोशल डिस्टन्सिंग
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर देशभरात वाईन शॉपपुढे लागलेल्या रांगा मद्यविक्रीची लोकप्रियता आणि त्यातून मिळणाऱ्या महसूलाचे महत्व दर्शवत होत्या; मात्र या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे मुंबईसह काही शहरात वाईन शॉप तातडीने बंद करावे लागले. त्यानंतर घरपोच मद्यविक्रीची कल्पना समोर आली. त्यासाठी देशभरात फूड डिलिव्हरीची यंत्रणा असलेल्या स्विगी, झोमॅटोने अनेक राज्यांशी बोलणी सुरु केली होती.

घरपोच मद्यविक्रीसाठी आम्ही अॅपमध्ये वाईन शॉप नावाची स्वतंत्र विभाग सुरु केला आहे. घरपोच मद्यविक्रीमुळे रिटेल्स व्यवसायिकांना अतिरिक्त व्यवसाय तर मिळेलच; शिवाय सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास मदत होईल. आठवडाभरात देशातल्या इतर शहरामध्ये ही सेवा सुरु करणार आहोत. 
- अनुज राठी, स्विगी 

झोमॅटोने रांची शहरात घरपोच मद्यविक्री सुरु केली आहे. काही दिवसात झारखंडच्या सात शहरात सेवा सुरु करणार आहोत. तंत्रज्ञानावर आधारीत घरपोच मद्यविक्रीमुळे एक जबाबदार आणि सुरक्षित व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल. 
- मोहित गुप्ता, कार्यकारी अधिकारी, झोमॅटो


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swiggy zomato to home deliver alcohol will start with this city amid coronavirus lockdown