
उल्हासनगर : गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या वतीने रात्री-बेरात्री पिण्याचे पाणी सोडण्यात येत असल्याने महिलांवर रात्रपाळी करण्याची वेळ हे वृत्त दैनिक सकाळने प्रकाशित करून या प्रकरणात स्वराज्य संघटना उडी घेणार असे स्पष्ट केले होते. या वृत्ताने खळबळ उडवून दिल्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 98 वर्षांपूर्वी 20 मार्च रोजी केलेल्या महाड सत्याग्रहाच्या दिवशीच ॲड.जय गायकवाड यांची स्वराज्य संघटना पाण्यासाठी रस्त्यावर उतरली होती.या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले असून पाण्याची वेळ निश्चित होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.