Farmers Protest | बळीराजाच्या समर्थनार्थ एल्गार परिषद प्रकरणातील बंदिवानांचे लाक्षणिक उपोषण

Farmers Protest | बळीराजाच्या समर्थनार्थ एल्गार परिषद प्रकरणातील बंदिवानांचे लाक्षणिक उपोषण


मुंबई  : केंद्र सरकार शेतकन्यांना कंपन्यांचा गुलाम बनवण्याचा घाट घालत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या विरोधात एल्गार परिषद प्रकरणातील बंदिवानांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. सामाजिक कार्यकर्यांनी आंदोलक शेतकयांना आपले समर्थन जाहीर करत त्यांनी उभारलेल्या या लढ्याला त्यांचे वकील निहालसिंग राठोड ह्यांच्या मार्फत खालील संदेश प्रसारित केला आहे.

या संदेशात म्हटले आहे की , आम्ही बंदिवान जरी प्रत्यक्षरित्या तुमच्या आंदोलनात सामील होऊ शकत नसलो तरी एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून आपल्या लकात सामील होत आहोत. आपल्या मागण्या यथायोग्य असून कायद्याच्या रूपाने केंद्रातील सरकारने शेतकयांना कंपन्यांचा गुलाम बनवण्याचा घाट घातलेला आहे. ह्या देशात जिथे शेतकऱ्यांना बळीराजा मानले जाते तिथेच राजरोसपणे त्यांची शेती हिसकावून अडानी - अंबानी ह्यांच्या दावणीला बांधण्याचा हा कुटील डाव आहे. काळाची पावले आधीच ओळखून आपण उभा केलेला हा जन लढा ऐतिहासिक तर आहेच सोबतच तो मस्तवाल झालेल्या केंद्र सरकारला शुद्धीवर आणण्याचे काम देखील करत आहे.

केंद्रातील सरकार व त्यांचे हस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यांना लोकशाही हि मुळातच नको आहे. लोकशाहीच्या, संविधानाच्या मुल्यांची जान करून देण्याला ते घाबरतात. यातूनच त्यांनी शेतकन्यांना आतंकवादी, देशद्रोही, दलाल इ. बिरुद लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यास शेतकयांनी व सुजाण जनतेने सत्ताधाऱ्यांना लावलेल्या चपराकीने त्यांच्या उरात धडकी भरलेली आहे असल्याचे ही पत्रकात म्हटले आहे. हा अश्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण उभा केलेला लढा हा अत्यंत प्रेरणादाई असून तो येणाऱ्या काळासाठी पथ दर्शक ठरेल. जगाच्या पोशिंद्याला रक्त गोठवणाऱ्या थंडीत अंगावर वारा पाण्याचा मारा झेलायला लावून त्यांच्या सोबत चर्चा करण्याएवजी धर्माच्या आधारावर फुट पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न देखील पुरेपूर करण्यात आला. शेतकरी बांधवानी दाखवलेली एकजूट, लढावूदाणा आणि दृढ निश्चय सर्व देशबांधवांसाठी प्रेरणेचे स्त्रोत बनेल यात कुठलीच शंका नाही. आम्ही त्यांच्या आंदोलनात पूर्णपने सामील आहोत व सर्व सुजाण नागरिकांना ह्या लढ्यात तन मन धनाने सामील होउन शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा असे आवाहन करतो." असे ही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

या प्रसिद्धी पत्रकात महेश राउत, सुधीर ढवले, सुरेंद्र गडलिंग, आनंद तेलतुंबडे, रोना विल्सन, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, महेश राउत, अरुण केरेरा, वर्णन गोन्साल्वीस, फादर स्टॅन सामी आणि गौतम नवलखा यांच्या नावाचा उल्लेख आहे

Symbolic fast of prisoners in Elgar Parishad case in support of farmers agitation 

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com